शेअरिंग-केअरिंग - 14 - ....लैंगिक संबंध.. - भाग - 11
प्राथमिक टप्प्यावर दोघांमध्ये संवादातून काही उपाय काढणे जेव्हा अवघड जाते तेव्हा बिनदिक्कतपणे तज्ञ डॉक्टरांना भेटून त्यांच्याकडून समुपदेशन, तपासणी व उपचार घेणे गरजेचे आहे. अनेकदा काही गोष्टी या फक्त समुपदेशनातून सुद्धा सुटू शकतात. काही बाबतीत आपल्या मनात असणारे पूर्वग्रह कारणीभूत असतात, कधी चुकीची माहिती, कधी चुकीचे समज, कधी चुकीचे सल्ले, कधी भिती तर कधी अतिकाळजी अशी अनेक मानसिक कारणे यामागे असू शकतात, जी समुपदेशनातून दूर होऊ शकतात. कधी कधी काही हार्मोन्सच्या कमी-जास्त प्रमाणामुळे लैंगिक इच्छांवर परिणाम होऊ शकतो. यावर काही औषधे घेतल्याने फरक पडू शकतो. कधी काही व्यसन, तंबाखू, दारू, सिगारेट यांच्या अतिसेवनामुळे इच्छा कमी होतात, त्यावरही वैद्यकीय सल्ले व उपचार घेऊनच काही करता येऊ शकते. त्यासाठी लैंगिक तज्ज्ञां (sexologist)ना भेटणे गरजेचे आहे. वैद्यकीय उपचार घेण्यामध्ये कोणताही कमीपणा किंवा संकोच बाळगण्याचे काहीही कारण नाही. इतर साध्या साध्या आजारांसाठी आपण जसे सहज डॉक्टरांकडे जातो, तसेच इथे सुद्धा जायला हवे. मी डॉक्टरांकडे ही जाणार नाही आणि आपापसांत पण काही बदल करायला तयार नाही, असं ...