पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही - भाग 9 (लैंगिकता - 1)

समलैंगिक, उभयलैंगिक किंवा पारलैंगिक असणे ही कमतरता किंवा प्रॉब्लेम नसून तितकेच नैसर्गिक आहे, जितके भिन्नलैंगिक असणे नैसर्गिक असते. ही गोष्ट आज एकविसाव्या शतकात सुद्धा समजून घेतली जात नाही, ही आपल्या समाजाची शोकांतिका आहे. मान्य आहे की भिन्नलैंगिक व्यक्तींची संख्या सध्या समाजात इतर लैंगिकतेच्या व्यक्तींपेक्षा जास्त प्रमाणात दिसत आहे. अर्थात - प्रत्यक्षात स्वतःची खरी लैंगिकता जाहीर करणाऱ्यांची संख्या आणि लपून छपून, समाजाच्या/ कुटुंबाच्या भीतीपोटी/दबावापोटी आपली खरी लैंगिकता लपवून भिन्नलिंगी असल्याचे दाखवणारी संख्या - यातील तफावत प्रचंड प्रमाणात असण्याची शक्यता गृहीत धरता वरील प्रमाण कितपत जास्त असू शकेल? हा संशोधनाचा मुद्दा आहे. पण समजा जरी तात्पुरते हे मान्य केले, की भिन्नलिंगी व्यक्तींच्या तुलनेत इतर लैंगिकता असणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण अल्प असेल, तरी ते 'आहे!' हे सत्य नाकारून कसे चालेल? कोणतेही सत्य अल्प प्रमाणात असले म्हणून ते असत्य होवू शकते का? किंवा त्याला कोणी नाकारू शकते का? आणि त्याच्याकडे डोळेझाक केली म्हणून किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले म्हणून कोणतेही सत्य लपते का? न...