पोस्ट्स

डिसेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

मुक्त लैंगिकतेचा पुरस्कार करताना किंवा याविषयी काहीही मत बनवण्याआधी आपल्याला मुक्त लैंगिकता म्हणजे नेमके काय? हे समजून घ्यायला हवे. फक्त लैंगिकता हा शब्द आल्यामुळे काहींच्या मनात त्याच्या मुक्तपणाविषयी नकारात्मक भावना येवू शकतात किंवा काहींना हे आपल्यासाठी मोकळे रान असल्यासारखे वाटू शकते. यासाठीच याच्या सर्व बाजू आधी समजून घेऊन मगच आपले मत बनवायला हवे. मुक्त लैंगिकतेचा विचार करताना सर्वप्रथम आपल्याला हे समजून घ्यावे लागते की समाजात वेगवेगळ्या प्रकारच्या लैंगिकतेचे व्यक्ती असतात. ज्यामध्ये भिन्नलिंगी, समलिंगी, उभयलिंगी, ट्रान्सजेंडर, असेक्शुअल व यांसारखे इतर अनेक प्रकार असतात. यातल्या काही प्रकारांविषयी आपल्या आधीच्या लेखांत व 'अग्गंबाई अरेच्चा' या पुस्तकात लिहिलेले आहेच आणि अजूनही पुढे सुद्धा शक्य तेवढ्या प्रकारांविषयी आपण बोलणारच आहोत. तर अशा सर्व प्रकारच्या लैंगिकता आपल्याला आधी किमान माहिती असायला हव्यात आणि मग त्या मान्य सुद्धा असायला हव्यात. या वेगवेगळ्या लैंगिकतेच्या व्यक्तींना आपण वेगळ्या नजरेने न पाहता किंवा यांच्याविषयी मनात कोणतेही नकारात्मक भाव न ठेवता त्यांनाही मोकळ...

'सेक्स' वर बोलू काही - पर्व 4 (भाग 2 - मुक्त लैंगिकते विषयी बोलताना...)

लैंगिकतेच्या मुद्द्यावर अजूनही जिथे सगळीकडे चुप्पी चे वातावरण आहे, तिथे मुक्त लैंगिकते बाबत परिस्थिती अधिक बिकट असणे साहजिकच आहे. आपल्या समाजात जिथे अजूनही लैंगिकता व लैंगिक संबंध यांविषयी मोकळेपणाने बोलण्याचे वातावरण नाही, तिथे मुक्त लैंगिकतेविषयी बोलणे, विचार करणे किंवा चर्चा करणे ही जरा दूरचीच गोष्ट वाटूच शकते. पण खरंतर हे लक्षात घ्यायला हवं की मुक्त लैंगिकतेचा मुद्दा आज नव्यानेच पुढे येतोय असं अजिबात नाहीये.  आपल्या अनेक प्राचीन शिल्प व दस्तऐवजांवरून तर आपली प्राचीन संस्कृती ही लैंगिकतेच्या बाबतीत अधिक मुक्त होती हे लक्षात येते. या शिल्पांमध्ये वेगवेगळ्या लैंगिकतेच्या व्यक्तींचे लैंगिक संबंध व सामूहिक लैंगिक संबंध यांचे सुद्धा दाखले आपल्याला मिळतात आणि याविषयी उघडपणे शिल्प कोरण्या इतका मोकळेपणा त्या काळात होता हेसुद्धा यावरून समजते. कामजीवनावर ग्रंथ लिहिणारा वात्स्यायन सुद्धा आपल्या प्राचीन संस्कृतीत होवून गेला व त्यामध्ये लैंगिक संबंध करताना करावयाच्या वेगवेगळ्या आसनांविषयी लिहिताना किंवा त्या आसनांचे चित्र काढताना त्याला कोणी अडवले नाही किंवा त्याच्या ग्रंथावर कुठे बंदी आणली ...