पोस्ट्स

जुलै, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पर्व 3- 'सेक्स'वर बोलू काही - भाग 11 - हस्तमैथुन म्हणजे काय? स्त्रिया व पुरुष हस्तमैथुन कसे करतात?

काही दिवसांपूर्वी माझ्या एका ऑनलाइन सत्रामध्ये एका मुलीने मला प्रश्न विचारला - "हस्तमैथुन म्हणजे काय?" - खरं तर अनेकांना हा प्रश्न अगदीच बालिश वाटू शकेल. 'हस्तमैथुन म्हणजे काय?' हे कुणाला माहिती नसणे शक्यच नाही असे वाटू शकेल. पण अनेकांना हस्तमैथुन म्हणजे नेमके काय हे माहीत नसते हे खरं आहे. त्यासाठी प्रत्येकाने स्वतःच्याच आयुष्याकडे जरी मागे वळून पाहिले तरी लक्षात येईल कि आपल्याला स्वतःला सुद्धा हस्तमैथुन या शब्दाची ओळख किती उशिरा आणि कशा प्रकारे झालेली असते ते.        आपल्याकडे एकूणच लैंगिकता व लैंगिक संबंध आणि त्यासंबंधित सर्व विषय हे झाकून ठेवण्याचे आणि उघडपणे कधी न बोलण्याचे विषय असल्याने हस्तमैथुन सारख्या विषयावर योग्य वयात योग्य ती माहिती मिळणे ही खूप अवघड गोष्ट झालेली आहे. अनेक किशोरवयीन मुले-मुली अगदी नकळतपणे अनेकदा अंतःप्रेरणेने हस्तमैथुन करण्यास सुरूवात करत असतात; पण याला हस्तमैथुन म्हणतात हे मात्र तेव्हा त्यांना माहीत नसते. म्हणूनच हस्तमैथुन विषयी लिहिताना अगदी बेसिक माहिती पासूनच सुरू करायला हवं असं मला वाटतं. हस्तमैथुन या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. य...

पर्व 3- 'सेक्स'वर बोलू काही- भाग 10 - स्त्रियांच्या कामेच्छा व कामतृप्ती

इमेज
मागच्या लेखात पुरुषांच्या लैंगिक आंनद व कामतृप्ती बाबत आपण पाहिलं. त्यामध्ये महत्वाचा रोल असणाऱ्या शिश्न, शिश्नदंड, शिश्नमुंड व शिश्नबंध यांच्याबद्दल सुद्धा माहिती घेतली. आता स्त्रियांच्या कामेच्छा व कामआनंद किंवा कामतृप्ती याबाबत या लेखात समजून घेऊयात.  स्त्रियांना नेमका कशाने जास्त आनंद मिळतो? यावर आजपर्यंत समाजात बऱ्यापैकी गूढच आहे. त्यामुळेच याविषयी अनेक गैरसमज सुद्धा पसरलेले असतात. त्यापैकी काही म्हणजे- 'स्त्री सेक्स मध्ये कधीच खुश होऊ शकत नाही.' 'स्त्रियांची सेक्स भावना ही पुरुषांच्या कित्येक पटीने जास्त असते, त्यामुळे एक पुरुष कधीच स्त्रीला सेक्सचा पुरेपूर आनंद देऊ शकत नाही.' अशा प्रकारच्या अनेक गैरसमजांमुळेच 'पुरुषाने कितीही प्रयत्न केला तरी स्त्री नेहमीच अतृप्तच राहते आणि राहणार' असा एक ढोबळ समज दृढ झाला आहे. आणि मग त्यामुळे स्त्रियांच्या आनंदाकडे, त्यांच्या कामतृप्तीकडे फारसे प्राधान्याने कधी पाहिलेच जात नाही. 'स्त्रियासुद्धा सेक्स मुळे तृप्त होऊ शकतात' हेच अनेक पुरुषांच्या कधी मनातही येत नसल्याने त्याविषयीचे प्रयत्न करणे दूरच राहते...