पोस्ट्स

शेअरिंग केअरिंग - भाग 40 (पालकत्व - 2 - मुलांच्या चुका)

मुलांनी केलेल्या चुकांकडे आपण कसे पाहतो? यावेळी आपण काय करतो? मला माझ्या लहानपणीचा एक प्रसंग आठवतो. आमच्या शेजारी राहणारे आमचे एक जवळचे स्नेही आमच्याकडे सहज गप्पा मारण्यासाठी आलेले होते. सोबत त्यांचा साधारण बारा तेरा वर्षांचा छोटा मुलगा पण होता. आम्ही सगळे घराच्या बाहेरच ओट्यावर गप्पा मारत बसलेलो होतो. अचानक त्यांना आठवले की त्यांना दुकानातून साखर आणायची होती. त्यांनी आपल्या मुलाच्या हातात पैसे दिले आणि बाजूलाच असणाऱ्या दुकानातून त्याला साखर आणायला सांगितली. मुलगा पळत गेला आणि साखर घेऊन लगेच पळत येऊ लागला. पण पळताना त्याच्या हातातून साखरेची पिशवी निसटून खाली पडली आणि पिशवी फुटल्यामुळे सगळी साखर मातीत गेली. हा प्रसंग अगदी आमच्या पुढे डोळ्यासमोर घडला. हे पाहून त्याच्यासोबत आम्ही मुलं सुद्धा घाबरलो होतो. कारण आमच्या स्वानुभवानुसार या चुकीसाठी आता त्याला किमान काही फटके तर खावेच लागतील हे आम्हाला माहिती होतं. तो मुलगा खाली मान घालून त्या साखरेकडे बघत उभा होता. आम्ही त्याच्या वडिलांकडे बघत होतो. ते आता किती आणि कसे रागावतील याचाच विचार आम्ही करत होतो. पण त्यांचा चेहरा मात्र अगदी शांत होता. ...

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

सर्वच लहान मुलं ही चुकांतूनच शिकत शिकत मोठी होत असतात. आज मोठे असणारेही अशाच पद्धतीने मोठे झाले आहेत आणि उद्याचेही असेच मोठे होणार आहेत. अशा वेळी त्यांच्याकडून होणाऱ्या चुकांच्या वेळी आजूबाजूचे मोठे त्यांच्याशी कसे वागतात? यावरून या लहानांचे भावविश्व आणि पुढील व्यक्तिमत्त्वातील अनेक गोष्टी घडत असतात. एकतर लहान मुलांसोबत राहताना, वागताना मोठ्यांनी अनेक गोष्टी आधी स्वतः समजून लक्षात घेऊन वागणे गरजेचे असते. मुलांसाठी हे जग पूर्णपणे नवीन आहे आणि आपल्यासाठी अगदी क्षुल्लक असणारी गोष्ट सुद्धा किंवा अगदीच गंभीर असणारी गोष्ट सुद्धा त्यांच्यासाठी मात्र नवीन असल्याने त्यांना या दोन्हीही गोष्टी सारख्याच असतात हे लक्षात घ्यायला हवे. मुलांच्या अनेक कृती किंवा बोलण्यांमध्ये त्यांचे आपल्याला माहिती असणारे अर्थ त्यांना अनेकदा माहिती पण नसतात किंवा त्यांचे महत्त्व किंवा गांभीर्य त्यांना माहिती नसते. अगदी निरागसपणे कुठेतरी ऐकलेले शब्द ते त्यांच्या त्यांच्या समजेनुसार कुठे कुठे वापरत असतात. हे जर आधी पालकांनी किंवा आजुबाजूच्या सर्वच मोठ्यांनी नीट समजून घेतले तर त्यांना आपल्या या लहान मुलांशी अशा प्रसंगी क...

शेअरिंग केअरिंग - 38 (गाठीभेटी - पुणे)

( फेसबुक वर 25 नोव्हेंबर 2024) मागच्या आठवड्यात तीन दिवस पुण्यात होतो. अनेक गाठीभेटी झाल्या. मंगला सामंत, मिलिंद जोशी, डॉ. कुमार सप्तर्षी, अन्वर राजन आणि युक्रांद मधील मित्र सचिन, अभि आणि आतिक भाई या सर्वांनाच खूप मोठ्या गॅप नंतर पुन्हा भेटणे झाले. अनेक विचारांची, भावनांची आणि आठवणींची उजळणी झाली. खूप फ्रेश वाटलं. रिचार्ज झाल्यासारखं वाटलं. काही आठवणींमध्ये खरंच एक वेगळीच ऊर्जा असते. ती ऊर्जा आम्ही अनुभवली. मार्च महिन्यात आम्ही काढलेल्या लैंगिकता विषयक अभ्यास दौऱ्यानंतर आज जवळपास आठ नऊ महिन्यांनी मंगला ताईंची भेट झाली. मंगला ताईंसोबतची चर्चा ही नेहमीच आम्हाला विचारांच्या एका पुढच्या टप्प्यावर घेवून जाणारी ठरली आहे. याही वेळी त्यांचे नुकतेच नव्याने प्रकाशित झालेले पुस्तक 'तंतोतंत' मध्ये त्यांनी स्त्री-पुरुष संबंध, लैंगिकता, विवाहसंस्था या सर्व विषयांवर लिहिलेल्या भन्नाट लेखांवर खूप अंगांनी चर्चा झाली. यात 'पुरुषांचे सबलीकरण, व्हिजिटिंग मॅरेज, विवाहित स्त्री पुरुषांची मैत्री, विवाहाचे ना हरकत प्रमाणपत्र' यांसारख्या अनेक लेख आणि त्यातील संकल्पनांवर व एकूणच समाजातील लैंगिकत...

शेअरिंग केअरिंग - 37 (आळस)

(फेसबुक वर 6 जुलै 2024) आपला आळस नेहमीच आपल्याला अधिक चांगला माणूस बनण्यापासून आणि अधिक चांगलं व आरोग्यदायी आयुष्य जगण्यापासून दूर नेत असतो. आपल्या आयुष्यातील अनारोग्याच्या अनेक समस्या, बौद्धिक, वैचारिक, सामाजिक कामातील, अभ्यासातील किंवा करिअर, व्यवसाय, नोकरी यातील, तसेच नात्यांतील अनेक समस्यांच्या मागे फक्त आपला आळस हे एकच कारण अनेकदा असते. या आळसावर नियंत्रण आणण्यात आपण जितके यशस्वी होतो, तितके आपण अधिक चांगले आणि आरोग्यदायी आयुष्य जगण्याकडे वाटचाल करत असतो. विशेष म्हणजे हे काही कुणापासून लपलेले नसते. जितका आळस जास्त, तितक्या आयुष्यातील संधी कमी आणि जितका आळस कमी, तितकी आपल्याला चांगलं, आरोग्यदायी आयुष्य जगण्याची संधी जास्त. हे कटू सत्य अगदी सर्वांनाच चांगलं माहिती असतं, पण तरीही आपण यावर मात करू शकत नाही ही खरी ट्रॅजेडी आहे. आळस छाती ठोकून रोज आपल्याला खुले आव्हान देत असतो आणि आपण रोज त्याच्यासमोर चितपट होत असतो. इतका हा समोरासमोर होणारा आपल्या भविष्याचा सामना आपण उघड्या किंवा बंद डोळ्यांनी रोज हरत असतो किंवा आपल्यालाच हरताना हताशपणे बघत असतो. तात्पर्य हेच की -  *उठा, आपल्या आळस...

पर्व 4 - सेक्स वर बोलू काही - भाग 13 (लैंगिक स्वास्थ्य - 3)

अनेक दिवसांपासून (किंवा वर्षांपासून) लैंगिक अस्वस्थतेत जगणारी ती.. (व्हिडिओ लिंक कमेंट मध्ये) हा एक व्हिडिओ खूप काही सांगून जातो. अशा कित्येक स्त्रिया आहेत की ज्या अशा पद्धतीने आपल्या लैंगिक इच्छा पूर्ण न होण्याने अस्वस्थ आहेत. पण त्या हे स्पष्ट बोलू सुद्धा शकत नाहीत. काहींनी हलकं बोलायचा प्रयत्न किंवा हिंमत केली तरी त्याबदल्यात त्यांना पुढे जो काही शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागतो, त्यानंतर पुढे याबद्दल चकार शब्दही काढण्याची त्यांची हिंमत होत नाही. काहींच्या घरी किमान हे बोलण्याइतपत परिस्थिती असते, पण बोलूनही ते गांभिर्याने घेतले जात नाही. काहींना असं बोलण्यामुळे हिंसक प्रतिक्रियांना सुद्धा सामोरे जावे लागते. शिवाय अनेकींना यामुळे पुढे कुटुंब आणि समाजात आपली बदनामी होईल याची सुद्धा भीती असते. या सगळ्यामुळे मनातील ही अस्वस्थता बोलून न दाखवण्याकडेच सर्वांचा कल असतो. पण बोललं नाही म्हणून ही अस्वस्थता संपते असं होत नाही. उलट ती आतल्या आत खूप वाढत राहते. त्याचे परिणाम त्या स्त्रीच्या वागण्या बोलण्यावर सुद्धा होतात. सतत अशा अस्वस्थतेत जगणाऱ्या स्त्रिया एका खूप मोठ्या मानसिक तणावात जगत ...

पर्व 4 - सेक्स वर बोलू काही - भाग 12 (लैंगिक स्वास्थ्य - 2)

कधी कधी परिस्थिती अशी असू शकते की आपली इच्छा असूनही जोडीदाराला लैंगिक आनंद देणे शक्य होत नाही. याची कारणे अनेक असू शकतात. कधी ती शारीरिक किंवा मानसिक असू शकतात; तर कधी दिवसभराचा ताण, रोजच्या कामाचे स्वरूप, दगदग, रोजचा थकवणारा प्रवास, घरातील कामं किंवा जबाबदाऱ्यांतून येणारा थकवा, काही आजारपण यातील किंवा यापेक्षाही वेगळी काही कारणे असू शकतात. त्या कारणांचा शोध घ्यायला हवा. त्यावर उपाय काढण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. उपाय दोघांनी आपापसांत बोलून निघणारे असतील तर ते काढायला हवेत. समस्या मानसिक असेल तर समुपदेशकांना भेटायला हवे. समस्या शारीरिक किंवा लैंगिक अवयवा विषयी काही असेल किंवा सेक्सची इच्छाच होत नसेल तर सेक्सोलॉजिस्टना भेटून त्यांची मदत घ्यायला हवी. पण यातील काहीच न करता फक्त समस्येला कुरवाळत बसणे व आपल्या किंवा जोडीदाराच्या लैंगिक अस्वास्थ्याकडे दुर्लक्ष करणे हे चुकीचे आहे. यातून हळूहळू मनातून एकमेकांबद्दल दुरावा तयार होऊन त्याचे पडसाद दैनंदिन जीवनातील इतर गोष्टींवर पडू शकतात. चांगले चाललेले वैवाहिक आयुष्य यातून हळूहळू बिघडू शकते. अर्थात आजही अनेकजण - सेक्स हा काय एवढा महत्त्वाचा घटक...

पर्व 4 - सेक्स वर बोलू काही - भाग 11 (लैंगिक स्वास्थ्य)

लैंगिक संबंधांबाबतचे असमाधान हे फक्त लैंगिक बाबीपर्यंतच मर्यादित न राहता त्यातून व्यक्तीच्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्यावर सुद्धा परिणाम होतो व त्यातूनच पुढे कौटुंबिक व सामाजिक स्वास्थ्य सुद्धा बिघडते. म्हणूनच लैंगिक स्वास्थ्य हे मानसिक, शारीरिक, कौटुंबिक, वैवाहिक व सामाजिक स्वास्थ्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते. प्रत्येकाचे लैंगिक समाधान, लैंगिक इच्छा व लैंगिक संबंधांबाबतच्या आवडी नावडी वेगवेगळ्या असू शकतात. तसेच कामेच्छा सुद्धा वेगवेगळ्या असू शकतात. यांमध्ये जास्त तफावत असणारे स्त्री पुरुष जर एकमेकांचे वैवाहिक जोडीदार असतील तर त्यांतील किमान एकाला किंवा कधी कधी दोघांनाही लैंगिक कुचंबना, असमाधान व अस्वास्थ्याला तोंड द्यावे लागते. अनेकदा या गोष्टीकडे जोडीदाराकडून दुर्लक्षच केले जाते. पण यातून तयार होणारी लैंगिक अस्वस्थता पुढे हळूहळू नात्यातील स्वास्थ्य सुद्धा हिरावून घेते. म्हणूनच आपल्या जोडीदाराच्या लैंगिक अस्वास्थ्याकडे दुर्लक्ष न करता ते दूर करण्याकरता प्रत्येक वैवाहिक जोडीदाराने प्रयत्नशील असायला हवे. त्यासाठी आपल्या जोडीदाराशी इतर गोष्टींप्रमाणेच लैंगिक संबंध व एकमेकांच्या लैंगिक इच...

लैंगिक संबंध

*लैंगिक संबंध ही आयुष्यातील अतिशय महत्त्वाची आणि तेवढीच आनंददायी असणारी गोष्ट.* *विवाह या एका संकल्पनेमुळे त्यावर आलेली अनेक बंधनं, त्याचवेळी या आनंददायी कृतीसाठी एक हक्काचा जोडीदार मिळणं, पण यामुळेच अनेकदा त्यातून एकाच व्यक्तीवर लैंगिक सबंधांसाठी येणारे बंधन, अपेक्षा व जबरदस्ती* कधी स्वतःची, तर कधी स्वतःकडून असणारी समोरच्याची लैंगिक इच्छा, अपेक्षा पूर्ण न होण्याने येणारे नैराश्य व ताणतणाव यात ग्रासलेली अनेक माणसं... जोडीदाराने स्वतःच्या लैंगिक आनंदासाठी इतरत्र शोधलेले मार्ग व यातून दुसऱ्या जोडीदाराला होणारा त्रास.. जोडीदारांमध्ये एकमेकांवर संशय घेण्याचेही एक मोठे कारण म्हणजे लैंगिक संबंधच.. तर कधी जोडीदाराने स्वतःच स्पष्टपणे इतरत्र पर्याय शोधायला सांगूनही तसा खात्रीचा पर्याय उपलब्ध नसल्याने असणारी अस्वस्थता.. कधी जोडीदाराला इतरत्र पर्याय शोधायला सांगणं, त्याला/तिला तो भेटणं, त्यांनी तो एन्जॉय करणं; पण ते करत असताना जोडीदाराकडे दुर्लक्ष होणं आणि त्यातून पुन्हा नात्यात ताण तणाव येणं.. कधी दोघांपैकी एका जोडीदाराला हवा तसा पर्याय मिळणं आणि त्यांनी तो एन्जॉय करणं; पण त्याचवेळी दुसऱ्या जोड...

विवाहबाह्य संबंध (ExtraMarital Affairs) - भाग ३

आपल्या पहिल्या पोस्टमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे - विवाहबाह्य संबंध चांगले की वाईट? त्यांच्याकडे कसं बघावं? त्याच्याशी डील कसं करावं? प्रत्येक विवाहबाह्य संबंध सेक्स पर्यंत पोहचलेले असतातच का? तसे नसेल तर त्यांच्याकडे कसं बघावं आणि त्यांचं नियोजन कसं करावं? - या विवाहबाह्य संबंधांच्या बाबतीत अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्यांच्यावर बोलायलाच हवं आणि पुढे आपण ते बोलू सुद्धा. पण सध्या तरी आपण विवाहबाह्य संबंधांमध्ये आपल्या वैवाहिक जोडीदाराशिवाय इतर कुणाशी असलेले लैंगिक संबंध या मुद्द्यावर फोकस करत आहोत. यासाठी या लेखात आपण आधी लैंगिक संबंध या विषयावर बोलुयात. आता लैंगिक संबंध याची साधी सरळ व्याख्या करायची झाली तर - कोणत्याही दोन किंवा अधिक प्रौढ व्यक्तींनी परस्पर संमतीने एकमेकांशी ठेवलेले लैंगिक संबंध - इतकी साधी व्याख्या होवू शकते. पण फक्त 'लग्न' या एका व्यवस्थेमुळे त्यात अनेक गुंते आणि अनेक प्रकार आपल्याला दिसतात. लग्न व्यवस्थेमुळे एका कोणत्याही व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यात लैंगिक संबंधांचे साधारण किती आणि काय काय प्रकार असू शकतात ते पाहूया.- १. लग्नापूर्वी एखाद्या अविवाहित स्त्र...

नाती जपताना - भाग २

समोरच्याच्या फार महत्त्वाच्या नसणाऱ्या तक्रारी व चुका यांच्याबाबत 'मान्य करणे (acceptance)' आणि 'दुर्लक्ष करणे (ignorance)' हे दोन उपाय प्रभावी ठरू शकतात हे आपण मागच्या लेखात पाहिले. थोडा बारकाईने विचार केला तर आपल्या हेसुद्धा लक्षात येईल की आपल्या सर्वांत जास्त तक्रारी या आपल्या जवळच्या माणसांबद्दल असतात. कधी कधी याच साध्या क्षुल्लक चुका इतर कुणाकडून होताना दिसल्या तर आपण त्या सहज दुर्लक्षित करतो; पण त्याच आपल्या जवळच्या व्यक्तीकडून झाल्या तर मात्र आपण त्याबाबत लगेच तक्रारी सुरू करतो. इतरांच्या बाबत व्यक्त होताना आपण अनेकदा त्यांना आवडेल का? त्यांना वाईट वाटेल का? याचा विचार करत असतो, पण तेवढा विचार आपल्या जवळच्या व्यक्तीबाबत व्यक्त होताना कधी करत नाही. आणि म्हणूनच आपल्या जास्त तक्रारी व भांडणे ही जवळच्या व्यक्तीसोबत होतात. कारण तिथे आपण एकमेकांचे मन जपण्याचा तेवढा गांभिर्याने विचार करत नाही. खरंतर एकवेळ हेच अगदी उलट असलं तरी चालू शकणार असते. म्हणजे दूरच्या व्यक्तीसोबत तक्रारी किंवा भांडणे झाली तरी त्याने आपल्या दैनंदिन आयुष्यात फार काही नुकसान होणारे नसते; याउलट जवळच्...