पोस्ट्स

जुलै, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

*समाजस्वास्थ्य आणि लैंगिकता चळवळ*

समाजस्वास्थ्य हे मासिक र धों नी सुरू केले होते. त्यावेळची परिस्थिती पाहता हे खूप धाडसाचे पाऊल होते. असंख्य अडचणींना सामोरे जात अगदी स्वतःची नोकरीच नाही, तर संपूर्ण आयुष्य पणाला लावत रधोंनी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत लैंगिकता प्रबोधनाचे काम चालू ठेवले. अनन्य साधारण काम होते ते.  रधोंनी शंभर वर्षांपूर्वी सुरू केलेले हे काम आजही तितक्याच गरजेचे वाटते. त्यातील संततिनियमन व त्यासाठीची गर्भनिरोधके याबाबतीत समाज पूर्णपणे नाही, तरी बऱ्यापैकी पुढे आला आहे असं नक्कीच म्हणता येईल; पण लैंगिक स्वातंत्र्य, वेगवेगळ्या लैंगिकता, समागम वैचित्र्य यांसारख्या अनेक गोष्टींबाबत आजही समाज म्हणून आपली फारशी प्रगती झाली आहे असे वाटत नाही. अजूनही अगदी स्वतःच्या लैंगिक अवयवांकडे सुद्धा इतर अवयवांसारखेच मोकळेपणाने पाहण्याची अनेकांची मानसिक तयारी होत नाही. आजही लैंगिकता या विषयावर 'तेरी भी चूप मेरी भी चूप' अशा प्रकारची चुप्पी धरून बसलेला समाज आपल्या आजूबाजूला दिसतोय. लैंगिकता, लैंगिक अवयव आणि लैंगिक संबंध यांविषयी आजही प्रचंड अज्ञान, गैरसमज, न्यूनगंड, टॅबू आणि विरोधाची भूमिका असल्याचे दिसते.  त्याम...