पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शेअरिंग-केअरिंग - 31 - मासिक पाळी इज 'नॉट हॅपी टू ब्लीड'

मासिक पाळी ही काही आनंदाची गोष्ट नाही. त्यामुळे ती सेलिब्रेट करण्याची सुद्धा गोष्ट नाही असं माझं स्पष्ट मत आहे. मासिक पाळी ही सर्वच स्त्रियांना त्रासाचीच बाब असते आणि त्यामुळे 'हॅपी टू ब्लीड' म्हणणाऱ्या किती स्त्रिया/मुली स्वतः 'ब्लीड' करताना 'हॅपी' असतात हा एक सर्वेक्षणाचा मुद्दा असेल. माझ्या मते जे जसे आहे, ते तसे स्विकारण्यात यायला हवे. मासिक पाळी दरम्यान प्रत्येक स्त्रीला त्रास होतोच. काही स्त्रियांना तो अगदी असह्य असतो, अगदी पोट धरून रडणाऱ्या, विव्हळणाऱ्या ही मुली/स्त्रिया असतात; तर काही स्त्रियांना होणारा त्रास हा सहन करण्याजोगा असतो. अगदीच जास्त त्रासदायक नसतो. काही स्त्रियांना मासिक पाळी दरम्यान खूप जास्त रक्तस्त्राव होतो, तर काही स्त्रियांना तो कमी प्रमाणात होतो. काही स्त्रियांची मासिक पाळी ही चार दिवसांपेक्षा जास्त लांबणारी असते, तर काही स्त्रियांची चार दिवसांचीच असते. काही स्त्रियांची मासिक पाळी नियमित असते, त्यामुळे त्यांना बरोबर तशा अंदाजाने नियोजन करता येते व तयारीत राहता येते; तर काही स्त्रियांची मासिक पाळी ही इतकी अनियमित असते कि त्यांच्या मनात स...

पर्व 3- 'सेक्स'वर बोलू काही- भाग 9 (लग्नानंतरचे लैंगिक असमाधान व पुरुषांची कामतृप्ती)

'लैंगिक असमाधान' व 'लैंगिक इच्छांचा जोडीदारावर होणारा अतिरेक' या दोन्ही समस्या गंभीर असून आजही अनेकजण या समस्यांना तोंड देत आहेत. आजकाल येणाऱ्या अनेक फोन व मेसेज मधून या समस्येबाबत व या समस्येतून जात असणाऱ्या बहुसंख्य स्त्री-पुरुषांबाबत अधिकच काळजी वाटायला लागलीय. 'नजरेआड सृष्टी' असं जे आपल्याकडे नेहमी म्हणतात ना, अगदी तसं या लैंगिक समस्यांच्या बाबतीत झालेलं आहे. आपण डोळे उघडून बघत नाही ना, तोपर्यंत सगळं 'मस्त चाललंय आमचं!' अशा स्टाईल मध्ये जगणं असतं सर्वांचं. पण डोळसपणे पाहायला गेलं तर जेव्हा कुठं बोलण्याची खात्रीपूर्वक जागा दिसेल, तेव्हा अनेकजण याविषयी आपल्या समस्या मांडत असतात. अर्थात अशा विषयावर कुणाशी बोलावं अशी खात्रीलायक माणसं सुद्धा खूप कमीच असतात आपल्या आजूबाजूला म्हणा. त्यामुळे सहसा याबाबतीत सगळ्यांची चुप्पीच असते. विषयच असा कि कुणाला सांगायची, बोलायची सोयच नसते. सांगितलं तरी ते समजून घेतील, गुपित ठेवतील व काही मदत करतील याची शक्यताही कमीच. अगदी आपल्या आई-वडिलांशी सुद्धा याविषयी बोलता येत नाही. तुलनेने पुरुषांची स्थिती पुरुषप्रधान व्यवस्थेमुळे ...

पर्व 3 - 'सेक्स'वर बोलू काही- भाग 8 (लैंगिक असमाधान व अस्वास्थ्य)

इमेज
लैंगिक असमाधानामुळे अस्वस्थ असणारी अनेक उदाहरणे आजूबाजूला दिसतायत व दिवसेंदिवस यांचे प्रमाण वाढतच जाताना दिसतंय. त्यापैकी काही प्रातिनिधिक उदाहरणे खाली देत आहे.  - लग्न होऊन पंधरा वर्षे झाली, दोन मुलेही झाली; पण एवढ्या वर्षांत पुरेसे लैंगिक सुख कधीच मिळाले नाही. आजही त्याविषयीची तीव्र इच्छा आहे. पण मार्ग दिसत नाही. - प्रेमविवाह होऊन बारा वर्षे होऊन गेली, पण जोडीदार लैंगिक संबंधांत अक्षम असल्याने अजूनपर्यंत एकदाही लैंगिक संबंधांचा अनुभव घेता आला नाही. आता इच्छा अनावर होतेय, पण मार्ग दिसत नाही. - लग्नानंतर काही दिवस लैंगिक संबंध सुरळीत होते. पण पुढे जोडीदाराची लैंगिक संबंधांविषयीची इच्छा कमी होत गेली. त्यामुळे लैंगिक सुखाच्या दृष्टीने असमाधानी व अस्वस्थ आहे. - वय वाढत चाललंय. अजूनही लग्नासाठी योग्य जोडीदार मिळत नाही. पण मनातील लैंगिक इच्छा मात्र आता अनावर होत आहेत. एकदा तरी आता हा अनुभव घ्यायची इच्छा तीव्र होत आहे. असे अनेक अस्वस्थ तरूण-तरूणी आजूबाजूला दिसत आहेत. - लग्न होऊन घटस्फोट झाला. पदरी मूल असल्याने दुसऱ्या लग्नात अडचणी आल्या किंवा येत आहेत....

पर्व 3 - 'सेक्स'वर बोलू काही (भाग 7) - लैंगिक अवयवांविषयीच्या अज्ञानातून होणारे गैरसमज (Misconceptions about sex organs)

इमेज
लहानपणापासून स्वतःच्या व इतरांच्या शिश्न/योनी विषयी असलेले कुतूहल जेव्हा तसेच दडपले जाते, तेव्हा पुढे जाऊन ते मनात अनेक गैरसमजांना जन्म देते. पुरुषांना नेहमी स्त्रीच्या योनीची जागा ही एक काहीतरी गूढ असल्यासारखे वाटत राहते आणि स्त्रियांना पुरुषांचे बाहेर लटकणारे शिश्न हे चमत्कारिक वाटत राहते. स्त्रीच्या योनीमार्गामध्ये नेमके असे काय असते जे पुरुषाच्या शिश्नाला सामावून घेऊ शकते? स्त्रीची योनी आत नेमकी किती लांब असते? तिची लांबी, रुंदी, खोली किती असते? एवढं मोठं शिश्न स्त्रीच्या शरिरात शिरते तरी तिला त्रास कसा होत नाही? आत कुठे जात असेल हे शिश्न? गर्भाशयात जात असेल का? कि पोटात जाते? पुरुषांचे बाहेर लटकणारे शिश्न त्यांना अडचणीचे ठरत नसेल का? ते एवढे मोठे शिश्न त्यांच्या अंडरवेअर मध्ये किंवा पँटमध्ये कसे काय बसत असेल? इतर वेळी सैल होऊन लटकणारे शिश्न संबंधांच्या वेळी अचानक मोठे कसे होते? आणि पुन्हा आपोआप छोटे व सैल कसे होत असेल? शिश्नामध्ये हाडे असतात का? कि एकच सलग मोठे हाड असते? कि लवचिक छोटी छोटी हाडे असतात? कि हाडच नसते? हाड नसेल तर मग ते ...

पर्व 3 - 'सेक्स'वर बोलू काही (भाग 6)- लैंगिक अवयवांविषयीचे संस्कार

इमेज
आपल्या लैंगिक अवयवांविषयीची काही बेसिक माहिती आपण मागच्या लेखात पाहिली. या अवयवांविषयी आपल्या समाजात कधीही मोकळेपणाने बोलले जात नाही, त्यामुळे त्याविषयीचे अनेक गूढ, कुतूहल आणि गैरसमज आपल्या मनात अनेक दिवस असतात. पुढे कधीतरी याविषयी शास्त्रीय माहिती कुणाकडून किंवा कुठून मिळाली तर बरं, नाहीतर शेवटपर्यंत हेच गैरसमज घेऊन आपण मोठे होतो आणि आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा याच गैरसमजासह वाढवतो. जर वेळीच या लैंगिक अवयवांविषयी मोकळेपणाने बोललं गेलं तर पुढचे अनेक गैरसमज व चुकीचे संस्कार थांबू शकतात. अगदी लहान वयापासूनच पुरुषांना व स्त्रियांना म्हणजे मुला-मुलींना एकमेकांच्या लैंगिक अवयवांविषयी कुतूहल असते. 'मुलांचे शिश्न' आणि 'मुलींची योनी ' हे अवयव सोडले तर बाकी सर्व अवयव लहानपणी मुलांना सारखेच दिसत असतात; त्यामुळे याच अवयवांविषयी त्यांच्या मनात खास कुतूहल राहणे साहजिक असते. जसे लहान मुलं त्यांना पहिल्यांदाच दिसणारी प्रत्येक गोष्ट चाचपून बघण्याचा, स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असतात, अगदी तसंच याबाबतीतही होत असतं. पण याबाबत पालक व आजूबाजूच्या नातेवाईकांकडून त्यांना मिळणारा प्रतिसाद, व...