पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शेअरिंग-केअरिंग- 25- मुक्त लैंगिकतेच्या दिशेने (पर्व 2 - भाग 10) गर्भनिरोधके- कधी, कोणती? योग्य-अयोग्य?- 3

अधिक खात्रीच्या गर्भनिरोधाच्या पर्यायांमध्ये पहिला पर्याय येतो तो म्हणजे कंडोम. हा पर्याय आता बऱ्यापैकी सगळ्यांच्या ओळखीचा व बऱ्यापैकी मान्यता असलेला आणि वापरला जाणारा पर्याय आहे. कंडोम मध्ये आधीच्या सर्व पर्यायांपेक्षा जास्त सुरक्षित लैंगिक संबंध करता येतात. कंडोममुळे फक्त अनैच्छिक गर्भारपणच टाळले जात नाही, तर लैंगिक संबंधांच्या वेळी संसर्गातून पसरू शकणाऱ्या अनेक लैंगिक आजारांपासून सुद्धा संरक्षण मिळते. शिवाय पुरुषांचे कंडोम किमतीने पण तसे फार महाग नसतात, त्यामुळे सहज कुणालाही ते परवडू शकते. यात वेगवेगळ्या चवीचे, वासाचे फ्लेवर असणारे व अधिक आनंद देण्यासाठी डॉट्स वाले कंडोम सुद्धा उपलब्ध असतात. लिंग व योनीच्या मध्येमध्ये लुडबूड जाणवू नये म्हणून कंडोम हे एकदम पातळ लेअर असणारे असतात. शिवाय योनीमध्ये लिंगप्रवेश करण्यास मदतच होईल अशा पद्धतीने काही ल्युब्रिकंट्स सुद्धा काही कंडोममध्ये वापरलेले असतात. एवढं सगळं असलं तरीही यामध्ये काही अडचणीही असतातच. त्या म्हणजे- कंडोम लावल्याने पुरुषाच्या लिंगाच्या त्वचेचा स्पर्श स्त्रीच्या योनीच्या भागाशी प्रत्यक्ष येत नाही, त्यामुळे काही पुरुष व स्त्रियां...

व्हॅलेंटाइन स्पेशल

बहिणा मासिकातील 'लग्नगाठी' या सदरातील मार्च 2018 चा लेख. *व्हॅलेंटाइन स्पेशल* - सचिन थिटे ------------------------- फेब्रुवारी हा  प्रेमिकांचा गुलाबी महिना नुकताच संपला. या व्हॅलेंटाइन महिन्यात नक्कीच अनेकांनी आपापल्या मनातील व्यक्तींना प्रपोज केलं असेल. कुणी आपापसातलं बिनसलेलं परत जुळवलं असेल. अनेकजण तर या महिन्याची आणि विशेषतः १४ फेब्रुवारी या दिवसाची आतुरतेने वाट पहात असतात. किती किती Plan आणि स्वप्नं या दिवसासाठी रंगवलेली असतात. कॉलेजवयीन मुलामुलींसाठी तर हा महिना म्हणजे जाम उत्साहाचा. हे दिवसच मुळी सगळे स्वप्नवतच असतात ना! कधीही परत न येणारे हे सगळे आनंदाचे क्षण. मैत्री – प्रेम – आकर्षण -भांडणं आणि काय काय नसतं या दिवसांत. आणि तरी हे सगळं आनंद देणारं असतं. जगच वेगळं असतं म्हणा ना हे! याच जगाबद्दल बोलणार आहोत आपण आज. प्रेमाच्या या प्रेममयी जगात रमणं सर्वांनाच अगदी हवंहवंसं वाटत असतं. असं काय असतं या प्रेमात? प्रेम म्हणजे काय? याची एकच अशी व्याख्या सांगणं तसं कठीणच. प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या वेगवेगळी असते. आपल्यातील एखादा कोणी अपवाद वगळता, प्रत्येकानेच या प्रेमाच्या हळुव...

शेअरिंग-केअरिंग - 24 - मुक्त लैंगिकतेच्या दिशेने (पर्व 2 - भाग 9) - गर्भनिरोधके- कधी, कोणती? योग्य-अयोग्य? - 2

काही काळ गर्भधारणा न होऊ देता लैंगिक संबंध ठेवताना वापरावयाचे काही पर्याय व निरोधके यांविषयी आपण बोलत आहोत. यापैकी पहिला पर्याय (आत-बाहेर - In-out Method) आपण पाहिला. यालाच 'अपूर्ण संभोग पर्याय' असेही म्हणतात. त्याची कारणेही आपण मागच्या लेखात पाहिली. दुसरा पर्याय आहे- डुश घेणे म्हणजेच योनीमार्ग धुणे. या पर्यायामध्ये पुरूषाचे वीर्यस्खलन जर योनीमध्ये झालेच तर लगेच त्या स्त्रीने साबणाचे पाणी किंवा इतर काही शुक्राणूनाशक औषध वापरून योनी धुवून काढायची. यामध्ये असणाऱ्या कार्बन डायॉक्साईड व ग्लुकोजमुळे शुक्राणू मरतात. पण हा पर्याय अजिबात विश्वासाचा नाही व यामध्ये अपयशाची शक्यताच जास्त आहे. काही महिला तर फक्त साध्या पाण्याने डुश घेतात. हे म्हणजे 'आ बैल मुझे मार' असाच मार्ग आहे. शिवाय यामध्ये सेक्स करताना सेक्सवर कमी व वीर्य कधी पडतंय यावरच त्या स्त्रीला जास्त लक्ष देऊन राहावं लागतं आणि वीर्य पडल्यापडल्या पळापळ करत ते धुवून टाकावे लागते. यादरम्यान सेक्सचा आनंद घ्यायचाच राहून जातो. पुढचा एक पर्याय म्हणजे वेगवेगळ्या अशा आसनांचा वापर करणे, ज्यामुळे वीर्य आत न सांडता बाहेर पडेल. उदाह...

प्रेम म्हणजे एकमेकांच्या आयुष्याचा कॉपीराईट नाही- सचिन थिटे

व्हॅलेंटाईन वीक सुरू झालेला आहे आणि सर्व प्रेमी युगुलांचे हे गुलाबी आणि रोमँटिक दिवस सेलिब्रेट करणे पण सुरू झालेलं आहे. हा आठवडाभर प्रेमिकांचं सगळं जग कसं गुलाबी झालेलं असतं. कुणी आपल्या प्रियकर-प्रेयसी सोबत तर कुणी आपल्या BF-GF सोबत वेगवेगळ्या रोमँटिक पद्धतीने हे दिवस घालवण्याचे प्लॅन करतंय, तर कोणी आपल्या मनातील 'टू बी BF-GF' ला यावर्षी तरी पटवण्याचे वेगवेगळे फंडे शोधतंय. यावर्षी तरी आपल्या मनातील राजकुमार/कुमारी आपल्याला भेटेल कि नाही? या आशेने कोणी आस लावून बसलंय, तर कोणी 'आपण काय प्रेम-बिम असल्या भानगडीतच पडणार नाही' आणि त्यामुळे 'आपणच कसे जगावेगळे अद्वितीय निपजलोय!' या आविर्भावात इतरांची मजा घेत बसलेत. या प्रेमाच्या दुनियेत तरंगत असताना प्रेम म्हणजे नक्की काय? हे मात्र आपण अनेकदा समजून घेतलेलंच नसतं. प्रेमाविषयी पालक, शिक्षक यांनी किंवा यांच्याशी मोकळेपणाने बोलण्याची आपल्याकडे पद्धतच नसल्याने आपल्यावर झालेले प्रेमाचे संस्कार हे गाणी, चित्रपट, मालिकांतून झालेले असतात. या सगळ्यांमध्ये प्रेमाची म्हणून जी काही व्याख्या आपल्याला दाखवली जाते ती मुळात प्रेमाची व्...

शेअरिंग-केअरिंग - 23 - मुक्त लैंगिकतेच्या दिशेने (पर्व 2 - भाग 8) - गर्भनिरोधके- कधी, कोणती? योग्य-अयोग्य?- 1

गर्भनिरोधकांच्या क्षेत्रातही तसं पाहिलं, तर अजून बराच गोंधळ आहे. कुठेही स्पष्टपणे याविषयी बोललं जात नाही. सहजरित्या माहिती उपलब्ध होईल अशी फारशी सोय नाही आणि लैंगिक संबंध हे जसे चोरून लपून करायची गोष्ट आहे, तसेच गर्भनिरोधके सुद्धा लपूनछपून वापरायचीच गोष्ट असल्यासारखी परिस्थिती अजून तरी आहे. डॉक्टरांना विचारायला जावं, तरी तिथंही बोलायची चोरीच. 'आम्हाला लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवायचे आहेत, तर कोणती गर्भनिरोधके वापरायला हवीत?' असा प्रश्न विचारण्याची हिंमत फक्त मनातच होते अशी स्थिती आहे. आणि उद्या कुणी हिंमत करून एखाद्या डॉक्टरांना विचारलंच, तर या प्रश्नाने त्या डॉक्टरांनाच भोवळ यायची शक्यता जास्त!  लग्नाआधी तर सोडाच, लग्नानंतर सुद्धा 'आम्हाला लगेच मूल नको असल्याने लैंगिक संबंध ठेवताना कोणती निरोधके वापरणे जास्त योग्य असेल?' असं विचारण्याचीही अनेकांची हिंमत होत नाही. त्यामुळे याविषयी विस्तृतपणे माहिती मिळतच नाही आणि मग मनातील गोंधळ अजून वाढत राहतो. लग्नाआधी किंवा लग्नानंतर लैंगिक संबंध ठेवताना गर्भ नको असल्यास कोणते पर्याय उपलब्ध आहेत व त्यातील कशाचे काय फायदे-तोटे आहेत? याव...

शेअरिंग-केअरिंग- 22 - मुक्त लैंगिकतेच्या दिशेने (पर्व 2 - भाग 7) गर्भनिरोधके- मुक्त लैंगिक संबंधांसाठी वरदानच

मागच्या लेखात आपण लैंगिक इच्छांसंदर्भातील उत्क्रांतीचा इतिहास पाहिला. त्यात सांगितल्याप्रमाणे लैंगिक संबंधांवर जास्त नियंत्रण ठेवू शकणाऱ्या स्त्रिया व बेजबाबदार पुरुष यांचे वंशज पुढे कमी झाले असावेत हे जरी खरे असले तरी याचा अर्थ त्यांनी जन्म दिलेल्या संतती या लैंगिक इच्छा कमी असणाऱ्या व बेजबाबदारच झाल्या किंवा उलट बाजूने लैंगिक संबंध जास्त ठेवणाऱ्या स्त्रिया व प्रेमळ, जबाबदार पुरुष यांच्या संतती याबाबत यांच्यासारख्याच होत्या असं नाही. काही प्रमाणात अनुवंशिकरित्या हे गुण आले असावेत अशी शक्यता आहे. पण या सगळ्यातून लैंगिक संबंधांच्या बाबतीत एक मानसिकता घडत जायला सुरुवात झाली हे नक्की.  कारण लैंगिक इच्छा व त्यावरील नियंत्रण याबाबत प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते व तत्कालीन आजूबाजूच्या परिस्थिती आणि विचारांचा त्यांच्यावर जास्त परिणाम होत असतो. त्यामुळे माता-पित्यांचे इतर अनेक संस्कार जसे संतती सहज स्विकारते, तसेच लैंगिकतेबाबतचे व बेजबाबदारी बाबतचे वर्तन हेसुद्धा याच संस्करातून मोठ्या प्रमाणात स्विकारले जातात. यातून एक स्पष्ट होते कि 'अनैच्छिक गर्भारपण' ही लैंगिक संबंधांच्या बाबतीत अत...