पोस्ट्स

ऑगस्ट, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पर्व 3 - 'सेक्स'वर बोलू काही- (भाग 14) हस्तमैथुन करत नसाल तर सावधान!!! हस्तमैथुनाचे फायदे

लेखाचे शिर्षक वाचून अनेकजण दचकले असतील. कारण आपण आत्तापर्यंत याच्या अगदी उलट ऐकत आणि समजत आलेलो असतो. 'हस्तमैथुन करत असाल तर सावधान!!' या भितीतच आत्तापर्यंत आयुष्य जगत आलेलो असताना अचानक हे याच्या उलट कसं काय? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर हे अगदी खरं आहे. आत्तापर्यंत आपल्याला एका चुकीच्या भितीत इतकं गुरफटवून टाकलेलं आहे कि यातलं नेमकं सत्य काय हेसुद्धा आपल्याला कळू दिलेलं नसतं. आज आपण हीच दुसरी बाजू पाहणार आहोत. हस्तमैथुन करणे ही मानवी कामविकासातील एक महत्वाची पायरी असते. खरंतर लग्न करण्याआधीची एक पूर्वअट म्हणूनच हस्तमैथुनाकडे पाहायला हवे. ज्या पुरुषाने लग्नाआधी एकदाही हस्तमैथुन केलेले नाही, त्याला लग्नानंतर लैंगिक संबंधांबाबत सुद्धा तक्रारी येण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. हस्तमैथुन करताना शिश्नमुंडावरील त्वचा हाताने मागे-पुढे केली जाते. तसेच लैंगिक संबंधांमध्ये सुद्धा शिश्न योनीमार्गात प्रवेश केल्यानंतर शिश्नाचे योनीमार्गाशी घर्षण होत असताना शिश्नमुंडावरील त्वचा मागे पुढे होणे गरजेचे असते. जर आधी एकदाही हस्तमैथुन केलेले नसेल किंवा क्वचितच केलेले असेल तर प्रत्यक्ष लैं...

पर्व 3 - 'सेक्स'वर बोलू काही- भाग 13 - हस्तमैथुनाविषयी एक छुपे सार्वत्रिक सत्य व अतिहस्तमैथुनाचे (विशेषतः पुरुषांच्या) दुष्परिणाम

हस्तमैथुन करणे अगदी नॉर्मल आणि नैसर्गिक असते हे आपण आत्तापर्यंत पाहिले. खरंतर आपल्या मनात हस्तमैथुनाविषयी भिती आणि न्यूनगंड येण्याचे कारण बहुतेकदा हेच असते कि आपण जे करतोय ते इतर कोणीच करत नसावं असं आपल्याला वाटत असतं. कारण आपल्या आजूबाजूला इतर कोणीच याविषयी मोकळेपणाने बोलत नसतं. चुकून कुणी बोललंच, तर तेसुद्धा 'हस्तमैथुन करणे कसे चुकीचे आहे' याविषयीच बोलताना आपण ऐकत असतो. इतरवेळी फक्त मित्र-मैत्रिणींच्या लपूनछपून केलेल्या चावट गप्पांमधून याबद्दल आपल्यापर्यंत जे पोचत असतं, तेही अर्धवट आणि चुकीचंच जास्त असतं. अगदी 'हस्तमैथुन' हा शब्द सुद्धा आपल्याला यातील कशातूनच सहसा ऐकायला मिळत नाही. त्यामुळे आपणच काहीतरी जगावेगळं चुकीचं कृत्य करतोय असं आपल्याला वाटायला लागतं आणि त्यातून भिती व न्यूनगंड वाढत जातो. त्यासाठी याबाबतीतले एक छुपे सार्वत्रिक सत्य आपण सर्वांनी समजून घ्यायला हवे. ते म्हणजे-  *'जगभरातील पुरुषांमध्ये काही अपवाद वगळता जवळपास सर्वच पुरूष वयात आल्यापासून हस्तमैथुन करत असतात. तर स्त्रियांमध्ये साधारण साठ टक्केपेक्षा जास्त स्त्रिया हस्तमैथुन करत असतात.'* ही आत...

पर्व 3 - 'सेक्स'वर बोलू काही- भाग 12- हस्तमैथुन म्हणजे पाप, घाणेरडी गोष्ट? हस्तमैथुन करणे योग्य कि अयोग्य?

हस्तमैथुन ही आज किंवा काल नव्याने उदयाला आलेली काहीतरी वेगळी भानगड नसून ही अगदी अनादि काळापासून मानवी समाजात अस्तित्वात असणारी क्रिया आहे. आपल्याकडे अनेक अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांनी व बाबा-बुवांनी हस्तमैथुन हे 'पाप' असल्याचे सांगितले आहे. प्रत्यक्ष हस्तमैथुनच नाही, तर हस्तमैथुनासंदर्भात मनात येणारे विचार सुद्धा पाप असल्याचे व अशा व्यक्तींचे हे वर्तन अनितीमान वगैरे असल्याचे त्यांनी सांगून ठेवलेले आहे. त्यामुळे एकूणच याविषयीचे आधीच अज्ञान आणि त्यात या महाशयांनी घालून ठेवलेली ही भीती यामुळे हस्तमैथुन हा नेहमीच बदनाम झालेला व केलेला विषय राहिला आहे. याविषयी योग्य ज्ञान देणारे आपल्या जवळपास कोणी भेटत नाही आणि त्यामुळे हा विषय मग तसाच मनात दबून राहतो. इथं मुळात एक लक्षात घ्यायला हवं कि हस्तमैथुन ही एक अतिशय नैसर्गिक गोष्ट आहे. मनुष्याप्रमाणेच काही प्राणी सुद्धा हस्तमैथुन करत असतात. वयात आल्यानंतर मुला-मुलींच्या शरिरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे भिन्नलिंगी किंवा समलिंगी व्यक्तींविषयी लैंगिक आकर्षण वाटायला लागते. मेंदूतून सतत लैंगिक अवयवांकडे कामसंदेश पाठवले जातात. यातून सेक्सची भा...