शेअरिंग केअरिंग - 35 (... आणि ऑपरेशन च्या दाढेतून मी परत आलो..) भाग ४
तिसऱ्या दिवशी सकाळी उठलो तेव्हा तर मी अजून फीट होतो. रात्रभर झोप पण छान झालेली होती. आता फक्त एकच अडचण राहिलेली होती, ती म्हणजे पोट साफ होत नव्हतं आणि पोटात बोटाने appendix च्या जागेवर दाबलं तरच दुखत होतं. आम्ही सकाळी सगळ्यात आधी सर्व जवळचे मित्र आणि कार्यकर्ते जे जे मला भेटायला येणार होते, त्यांना तातडीने कळवायला सुरू केलं की आजचे ऑपरेशन आता उद्या होणार आहे आणि कालच्या ऐवजी आज रात्री मी admit होणार आहे. मला आणि किरण ला गुढीपाडव्याची सुट्टी होती. पण निशाला सुट्टी नव्हती. त्यामुळे ऑफिस ला जायचं की नाही हे ठरवणं तिला अवघड जात होतं. मी सांगत होतो की - 'मला आता काहीच त्रास होत नाही, त्यामुळे तू जा ऑफिस ला'. पण तिची मनाची तयारी होत नव्हती. अजून रिपोर्ट आलेला नाही, त्यात काय येईल माहीत नाही. त्यामुळे तिला जावं की नाही हे कळत नव्हतं. शेवटी मग दुपारपर्यंत माझी अवस्था कशी आहे हे पाहून मग दुपारी हाफ डे ला जाईल असं तिनं ठरवलं. मग मी माझ्या ऑफिस च्या कन्सल्टंट डॉक्टरांशी आणि आमच्या गावाकडील फॅमिली डॉक्टरांशी पण बोलून घेतलं. दोघांचं ही म्हणणं होतं की रिपोर्ट येईपर्यंत थांबायला हवं. मगच ऑपरे...