पोस्ट्स

सप्टेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पर्व 3 - 'सेक्स'वर बोलू काही - भाग 15 - स्त्रिया व हस्तमैथुन & स्त्री-पुरुषांच्या हस्तमैथुनातील फरक

आत्तापर्यंतच्या लेखांत आपण 'हस्तमैथुन म्हणजे काय?', 'हस्तमैथुनाविषयीचे गैरसमज' व 'हस्तमैथुनाचे फायदे' याविषयी माहिती पाहिली. हस्तमैथुन म्हटलं कि सहसा फक्त पुरुषांच्या हस्तमैथुनाविषयीच जास्त चर्चा होते. कारण स्त्रिया सुद्धा हस्तमैथुन करू शकतात हे अजूनही इतकं समाजमान्य झालेलं नाही. त्यामुळे प्रत्यक्ष स्त्रिया सुद्धा याविषयी आपापसांतही फारसं बोलताना दिसत नाहीत. अर्थातच न बोलल्याने याविषयी अनेक गैरसमज सुद्धा पसरलेले असतात. तर आज जरा थोडं स्त्रियांच्या हस्तमैथुनाविषयीच अधिक समजून घेऊयात. 'स्त्रियासुद्धा हस्तमैथुन करतात', 'स्त्रियासुद्धा हस्तमैथुन करू शकतात' आणि 'स्त्रियांनी हस्तमैथुन करणे हे पुरुषांनी हस्तमैथुन करण्या इतकेच नॉर्मल असते' या बेसिक गोष्टी आधी आपण सुरुवातीलाच लक्षात घेऊयात. त्यामुळे आत्तापर्यंत जर आपल्यापर्यंत असं काही पोचलं असेल कि- 'स्त्रियांनी हस्तमैथुन करणे चुकीचे, अनैतिक किंवा चारित्र्यहीन असल्याचे लक्षण आहे' तर ते चुकीचे आहे. पुरुषसत्ताक व्यवस्थेने आणि मुळात लैंगिक संबंध व लैंगिक इच्छा यांनाच पाप समजणाऱ्या आणि यांपास...