पोस्ट्स

मे, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही - भाग 10 (लैंगिकता - 2)

लैंगिकता म्हणजे लिंगविषयक मानसिकता. स्त्री, पुरुष किंवा इतर लैंगिकतेच्या व्यक्तींचे लिंगविषयक विचार, भावना व वर्तन म्हणजे लैंगिकता होय. ही लैंगिकता बहुतांशी प्रत्येकाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सोबत असते. लैंगिकतेविषयीचे आपले आचार-विचार हे आपले व्यक्तिमत्त्व ठरवत असतात. त्यामुळेच लैंगिकता ही आपल्या व्यक्तिमत्वाचा सुद्धा एक भाग असते. मेंदूतील हार्मोन्स चे प्रमाण, स्वतःची व आजूबाजूची मानसिक, शारीरिक, सामाजिक व कौटुंबिक परिस्थिती यांसारख्या अनेक गोष्टी आपली लैंगिकता ठरण्यात किंवा ठरवण्यात कारणीभूत असतात किंवा मदत करत असतात. त्यानुसार लैंगिकतेचे अनेक वेगवेगळे प्रकार पडतात. आपल्या आजूबाजूला स्त्री व पुरुष यांच्यासोबत व यांच्यामध्ये सुद्धा अनेक वेगवेगळ्या लैंगिकता असणाऱ्या व्यक्ती सुद्धा राहत असतात. स्त्रियांना पुरुषांविषयी व पुरुषांना स्त्रियांविषयी आकर्षण असेल तर अशा स्त्री पुरुषांना भिन्नलिंगी आकर्षण असणारे स्त्री - पुरुष (Heterosexual) म्हणतात. काही स्त्रियांना फक्त स्त्रियांविषयी व काही पुरुषांना फक्त पुरुषांविषयीच लैंगिक आकर्षण असते. त्यांना समलिंगी आकर्षण असणारे स्त्री व पुरुष (Homos...