पोस्ट्स

जानेवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शेअरिंग-केअरिंग - 21 - मुक्त लैंगिकतेच्या दिशेने (पर्व 2 - भाग 6) - स्त्री-पुरुषांच्या लैंगिक इच्छा वेगवेगळ्या?- इतिहास

स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त कामेच्छा असते आणि त्यांची इच्छा लवकर पूर्ण होत नाही, म्हणून त्या लैंगिक संबंधात लवकर तृप्त किंवा समाधानी होत नाहीत असा एक समज अनेकांमध्ये असतो, जो अत्यंत चुकीचा आहे. मानवी लैंगिक संबंधांचा इतिहास पाहता, खरी परिस्थिती याच्या अगदी उलट असल्याचे आपल्या लक्षात येते. त्यानुसार पुरुषांना कामेच्छा जास्त असते व त्या तुलनेने स्त्रियांना ती कमी असते. (लैंगिक इच्छा व लैंगिक तृप्ती या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे इथे लक्षात घ्यावे. लैंगिक तृप्ती या विषयावर पुढे बोलूच, सध्या या लेखात लैंगिक इच्छेवर बोलूयात.)  याची कारणे आपल्या उत्क्रांतीच्या इतिहासातच दिसतात. पुरुष अगदी सुरुवातीपासूनच कितीही मुक्तपणे लैंगिक संबंध ठेवू शकत होता, कारण त्यामुळे त्याच्याकडे कोणतेही गर्भारपण येणार नव्हते व त्यामुळे त्यांना जबाबदऱ्यांमध्ये अडकणेही नव्हते. स्त्रियांना मात्र लैंगिक संबंध करताना खूप गोष्टींचा विचार करावा लागे. लैंगिक संबंध करताना गर्भारपण येण्याची व त्यामुळे पुन्हा अनेक दिवस जबाबदऱ्यांमध्ये अडकण्याची, अवघडलेपण येण्याची व जीवघेण्या प्रसुतीला सामोरे जाण्याची भीती त्यांच्या...

शेअरिंग-केअरिंग - 20 - मुक्त लैंगिकतेच्या दिशेने (पर्व 2 - भाग 5) - लैंगिक इच्छा व्यक्त करताना

आपल्या लैंगिक इच्छा व्यक्त कशा करायच्या? यावर आजपर्यंत आपल्याशी ना कोणी बोललेले असते, ना कुठे यावर मार्गदर्शन दिले जाते. उलट अशी इच्छा व्यक्त करणेच आजपर्यंत कुठे गृहीत धरलेले दिसत नाही. पण ही इच्छा तर प्रत्येकाच्याच मनात असते आणि ती अनेकांच्या मनात अनेकदा तीव्र प्रमाणात सुद्धा असते हेही तेवढेच सत्य आहे. या इच्छेचे सतत दमन करत राहणे योग्य नाही आणि असं करण्यातून अनेक मानसिक, शारीरिक व सामाजिक प्रश्न निर्माण होतात हेही जवळपास सर्वांनाच मान्य आहे. पण तरीही या विषयावर उघडपणे कोणीच बोलत नाही आणि त्यामुळे ही इच्छा समस्या बनत जाते आणि याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतात. यासाठी सर्वप्रथम लैंगिक इच्छांचा सन्मानाने स्विकार करायला आपण शिकायला हवं. माझ्या मनात एखाद्याबद्दल लैंगिक संबंधाची इच्छा निर्माण होणे हे वाईट किंवा चुकीचे नसून उलट मी मेडिकली फिट असण्याचेच लक्षण आहे हे आधी लक्षात घ्यायला हवे. हे जसे आपल्या स्वतःच्या बाबतीत तसेच इतरांच्या बाबतीतही आहे- म्हणजे एखाद्याला माझ्यासोबत लैंगिक संबंध करण्याची इच्छा होणे यात वाईट किंवा चुकीचे काहीच नाही. असंच आपल्या परिचयातील इतर कुणाला कुणाबद्दल...

शेअरिंग-केअरिंग - 19 - मुक्त लैंगिकतेच्या दिशेने (पर्व 2 - भाग 4)

लहान वयात लग्न झालं. लग्नाला 15 वर्षे होत आली. मुलंही आहेत. पण एवढ्या वर्षांत कधी पुरेसे लैंगिक सुख म्हणावे असे कधी तिला भेटलेच नाही. शिवाय ही गोष्ट अशी की कुणाला सांगताही येत नाही. बरं त्याला अजिबातच काही जमत नसतं तर निदान ते कारण सांगून या नात्यातून मोकळं तरी होता आलं असतं आणि दुसरं जोडता आलं असतं. त्यात परत माणूस म्हणून तो खूपच चांगला आहे. पुन्हा असा चांगला माणूस मिळेल का ही शंका आहेच. या सगळ्या विवंचनेत कशी वर्ष निघून चाललीयत माहीत नाही, पण आजही जेमतेमच कधीतरीच लैंगिक सुख अनुभवयास मिळते. खूप कोंडी होतेय, आतून खूप इच्छा होतेय मनसोक्त लैंगिक सुख घेण्याची. पण काहीच पर्याय नाही.  अशी एक नाही, अनेक उदाहरणं प्रत्यक्ष पोचली आमच्यापर्यंत. ती घालमेल पाहूनच अस्वस्थ व्हायला होतं. माझी जोडीदार मला पुरेसे लैंगिक सुख मिळू देण्यात असमर्थ आहे. मला कधीकधी खूप अस्वस्थ होतं. मी काय करू? लग्नानंतर बाहेर संबंध ठेवणे योग्य आहे का? विवाहबाह्य संबंध ठेवणे गैर आहे का? पाप आहे का? अशी विचारणा करणारे अनेक पुरुषही या लेखमालेच्या निमित्ताने भेटले. अर्थात यात पुरुषांची स्थिती जेवढी गंभीर वाटली, त्यापेक्षा त...

शेअरिंग-केअरिंग - 18 - इन्सानों कि सोच पे लगी जंजिरे

एक बार दुसरी दुनिया से इन्सानों कि दुनिया में आई हुई एक लडकी, इन्सानों कि दुनिया के एक लडके के साथ (जो कि अब उसका अच्छा दोस्त बन गया है) रहती है। जगह छोटी होती है, इसलीये रात को सोने के टाइम पे लडका लडकी को बिस्तर लगा कर देता है, और खुद सोने के लिये कही ओर जगह ढूँढने लगता है। लडका : तुम यहाँ पर सो जावो। लडकी : और तुम? लडका : मैं.. मैं.. (इधर उधर जगह देखकर) मैं वहाँ पर सोता हुं। लडकी : क्यों? यहाँ पर इतनी जगह तो है ना मेरे बाजू में। लडका : जगह है, पर मैं वहाँ पर नहीं सो सकता। लडकी : क्यों? लडका : क्यों कि हम इन्सानों कि दुनिया में आदमी और औरत साथ में नहीं सोते। लडकी : क्या? पर क्यों? लडका : क्यों मतलब...(सोचने लगता है..) लडकी : मतलब क्या इन्सानों कि दुनिया में कभी भी कोई आदमी और औरत साथ में नहीं सोते? लडका : नहीं। वैसा नहीं है। लडकी : फिर? लडका : सिर्फ शादी होने के बाद ही कोई आदमी किसीं औरत के साथ सोता है। लडकी : तो क्या तुम्हारी अभी तक शादी नहीं हुई? लडका : हुई है। लडकी : फिर तो तुम सो सकते हो ना? लडका : नहीं। मैं सिर्फ उसी औरत के साथ सो सकता हुं, जिसके साथ मेरी शादी हुई है। या फिर मेर...

शेअरिंग-केअरिंग - 17 - मुक्त लैंगिकतेच्या दिशेने - (पर्व 2 - भाग 3) - र. धों. ना आठवताना

एक लग्नाची बायको असताना दुसरीशी संबंध ठेवणे किंवा एक नवरा असताना दुसऱ्या पुरुषांशी संबंध ठेवणे म्हणजे जर व्यभिचार असेल, तर असे व्यभिचार तर देवाला सुद्धा मान्य होते असे म्हणावयास सक्षम आधार आहे. कारण ज्याला भगवान म्हटलंय असा भगवद्गीता या ग्रंथाचा प्रणेता, हजारो गोपींचा कान्हा असणारा श्रीकृष्ण, त्याचे मित्र पांडव, नवऱ्याशिवाय इतर सहा पुरुषांसोबत संबंध ठेवून त्यांच्यापासून होणाऱ्या मुलांना जन्म देणारी आई कुंती आणि पाच-सहा पुरुषांना नवरा मानून त्यांच्यासोबत संबंध ठेवणारी बायको द्रौपदी या सर्वांनी तर या अशा व्यभिचाराचे धडेच घालून दिले आहेत. आपल्या इतरही अनेक पुराणग्रंथांत बायकोशिवाय इतर स्त्रियांशी संबंध ठेवण्याची अनेक प्रयोजने करून ठेवलेली पानोपानी दिसतात आणि त्यांचे वेळोवेळी फायदे घेणारे धर्ममार्तंड किंवा ज्यांना देव म्हटलं गेलंय असेही अनेकजण दिसतात. त्यामुळे उगाच धर्माचा आधार घेऊन किंवा भिती दाखवून व्यभिचाराचा बागुलबुवा उभा करणाऱ्या सनातन्यांना घाबरायची काहीही गरज नाही. अर्थात वैज्ञानिक दृष्टीने विचार करणाऱ्या कुणालाही या धार्मिक विवेचनांचा आधार घ्यायची काहीही गरज नाही.  *विवाहानंतर ...

मुक्त लैंगिकतेच्या दिशेने (पर्व 2 - भाग 2) - मनातील लैंगिक इच्छा

शेअरिंग-केअरिंग - 16 *मुक्त लैंगिकतेच्या दिशेने*       *(पर्व 2 - भाग 2)* *मनातील लैंगिक इच्छा* ------------------------------ मला सेक्स हवाय. मला सेक्स करण्याची खूप इच्छा होतेय. ही वाक्यं कधी आपल्या कानावर पडली आहेत का हो? मित्र-मैत्रिणींकडून, सहकाऱ्यांकडून, आजूबाजूच्या लोकांकडून, नातेवाईकांकडून किंवा किमान जोडीदाराकडून तरी? बरं किमान आपण स्वतः तरी आजपर्यंत असं कुणाला बोललोय का? नाही ना? का बरं? अशी इच्छा कधी कुणाला होतच नसते म्हणून का? कि कितीही इच्छा झाली असली तरी असं बोलायचं नसतं अशी अलिखित रीत आपल्या समाजात आहे म्हणून? शीss, हे असलं कुठं बोलायचं असतं का? असंही अनेकांच्या/अनेकींच्या मनात येत असेल. मला खूप भूक लागलीय, मला खूप तहान लागलीय किंवा मला खूप झोप येतेय हे आपण जितक्या सहजपणे एकमेकांना सांगू शकतो, तितक्या सहज आपल्या लैंगिक गरजा सांगू शकतो का? मान्य आहे कि लैंगिक संबंध किंवा लैंगिक गरज हा खूप खाजगी मुद्दा आहे आणि तो आपण इतक्या सहज कुणालाही जाहिररित्या सांगू शकत नाही. पण किमान आपल्या जोडीदाराला तरी कधी आपण हे सांगू शकलोय का? आपल्या जवळच्या मित्राला/मैत्रिणीला, आपल...

मुक्त लैंगिकतेच्या दिशेने (पर्व 2- भाग 1)

*शेअरिंग-केअरिंग - 15* *लैंगिकतेच्या बंदिस्त चौकट्यांकडून..* *मुक्त लैंगिकतेच्या दिशेने*      *(पर्व 2 - भाग - 1)* काल समाजस्वास्थ्य हे नाटक पुन्हा एकदा पाहिलं. (नाटकाची लिंक:- https://youtu.be/rF3v7-S4BPM) सोबतच समाजस्वास्थ्य ची छोटी पुस्तिका, जी त्या नाटकाच्या वेळीच सर्वांना वाटली गेली होती, तिचे पण वाचन सुरू आहे. रघुनाथ धोंडो कर्वे अर्थात र धों कर्वे यांनी 1930-40 च्या सुमारास मांडलेली लैंगिकतेबद्दलची मते आपला समाज आजसुद्धा मान्य करू शकलेला नाहीये हे पुन्हा एकदा प्रकर्षाने लक्षात आलं. मान्य करणं तर दूरच, पण त्याबद्दल बोलणे सुद्धा वर्ज्य आहे. जवळपास 100 वर्षांपूर्वी र धों नी केलेली क्रांतिकारक मांडणी आजसुद्धा तेवढीच किंबहुना त्याहूनही अधिक धाडसाची वाटते ही शोकांतिका आहे. म्हणजे समाज म्हणून आपण इतर अनेक बाबतीत विकसित होत असताना लैंगिकतेच्या बाबतीत मात्र अधिकाधिक मागासत चाललोय का? कि याबाबतीतील आपली प्रगती अजूनही 100 वर्षांमागेच अडकून पडलेली आहे? असे प्रश्न पडायला लागलेले आहेत. र धों जर आज असते तर त्यांनी केलेली 100 वर्षांपूर्वीची मांडणी त्यांनी आज 100 वर्षानंतर कशी केली ...