पर्व 4 - सेक्स वर बोलू काही - भाग 13 (लैंगिक स्वास्थ्य - 3)
अनेक दिवसांपासून (किंवा वर्षांपासून) लैंगिक अस्वस्थतेत जगणारी ती.. (व्हिडिओ लिंक कमेंट मध्ये) हा एक व्हिडिओ खूप काही सांगून जातो. अशा कित्येक स्त्रिया आहेत की ज्या अशा पद्धतीने आपल्या लैंगिक इच्छा पूर्ण न होण्याने अस्वस्थ आहेत. पण त्या हे स्पष्ट बोलू सुद्धा शकत नाहीत. काहींनी हलकं बोलायचा प्रयत्न किंवा हिंमत केली तरी त्याबदल्यात त्यांना पुढे जो काही शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागतो, त्यानंतर पुढे याबद्दल चकार शब्दही काढण्याची त्यांची हिंमत होत नाही. काहींच्या घरी किमान हे बोलण्याइतपत परिस्थिती असते, पण बोलूनही ते गांभिर्याने घेतले जात नाही. काहींना असं बोलण्यामुळे हिंसक प्रतिक्रियांना सुद्धा सामोरे जावे लागते. शिवाय अनेकींना यामुळे पुढे कुटुंब आणि समाजात आपली बदनामी होईल याची सुद्धा भीती असते. या सगळ्यामुळे मनातील ही अस्वस्थता बोलून न दाखवण्याकडेच सर्वांचा कल असतो. पण बोललं नाही म्हणून ही अस्वस्थता संपते असं होत नाही. उलट ती आतल्या आत खूप वाढत राहते. त्याचे परिणाम त्या स्त्रीच्या वागण्या बोलण्यावर सुद्धा होतात. सतत अशा अस्वस्थतेत जगणाऱ्या स्त्रिया एका खूप मोठ्या मानसिक तणावात जगत ...