पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पर्व 3 - 'सेक्स'वर बोलू काही (भाग 5) - स्त्री-पुरुषांचे लैंगिक अवयव

इमेज
आपण आपल्या शरीराच्या इतर सर्व अवयवांविषयी अनेकदा बोलतो. मोकळेपणाने एकमेकांशी शेअर करतो. पण आपल्या लैंगिक अवयवांविषयी मात्र कधीच बोलत नाही आणि त्यामुळेच त्यांविषयी आपली आपल्यालाच खूप कमी माहिती असते. त्याविषयीची शेअरिंग सुद्धा कधी आपापसांत फार होताना दिसत नाही. म्हणूनच आज जरा आपल्या या लैंगिक अवयवांविषयी बोलूयात. तसेच स्त्री व पुरुष यांच्या लैंगिक अवयवांमध्ये काही प्रमाणात साम्य आणि बऱ्याच बाबतीत फरक असतो. तो नेमका काय आणि कसा ते सुद्धा जाणून घेऊयात. स्त्रीच्या लैंगिक अवयवाला 'योनी' व पुरुषाच्या लैंगिक अवयवाला 'लिंग' म्हणतात हे आपल्या सर्वांना आत्तापर्यंत माहिती आहे. पण खरेतर 'योनी' व 'लिंग' हे शब्द फक्त आपल्या बोलण्याच्या सोयीसाठी वापरलेले असावेत असं वाटतं. कारण फक्त 'योनी' म्हणजे स्त्रीचे लैंगिक अवयव नसून योनी हा स्त्रीच्या अनेक लैंगिक अवयवांपैकी एक आहे. अनेकांना हे ऐकून आश्चर्य वाटेल कि स्त्रियांमध्ये योनीमार्ग व मूत्रमार्ग हे सुद्धा वेगवेगळे असतात. म्हणजे लैंगिक संबंधाच्या वेळी पुरुषाचे लिंग आत जाण्याची जागा, मासिक पाळी...

पर्व 3 - 'सेक्स'वर बोलू काही (भाग 4)- व्हर्जिनिटी (कौमार्य)- 2

इमेज
मागच्या लेखात आपण व्हर्जिनिटी विषयी समाजात असलेला दुराग्रह आणि किळसवाण्या प्रथा पाहिल्या व सोबतच स्त्रीच्या योनीमार्गातील हायमेनच्या पडद्याविषयी थोडक्यात समजून घेतलं. आज आपण हायमेन आणि व्हर्जिनिटी याविषयी थोडं अधिक विस्तारात पाहुयात. मागच्या लेखासोबत असलेल्या चित्रातील आकृत्यांमध्ये आपण हायमेनच्या पडद्याचे वेगवेगळे आकार व स्वरूप पाहिले. म्हणजेच सर्वच स्त्रियांच्या हायमेनची रचना सारखी नसून प्रत्येक स्त्रीमध्ये याबाबतीत वेगळेपण असू शकते हे आपल्या लक्षात आले असेल. तसेच काही वेळा तर शेवटच्या आकृतीत (मागच्या लेखातील) दाखवल्याप्रमाणे काही स्त्रियांच्या योनीमार्गात हा हायमेनचा पडदाच नसतो किंवा अगदीच नगण्य असतो. शिवाय जरी हायमेनचा पडदा असला तरी तो पहिल्या सेक्सच्या वेळी नेहमी फाटतोच असे नाही तर अनेकदा ताणला सुद्धा जाऊ शकतो आणि त्यामुळे रक्त निघण्याची शक्यता नसते. त्यामुळे इथे हे सर्वप्रथम प्रामुख्याने समजून घेतले पाहिजे कि- 'हायमेन ब्रेक होणे' म्हणजे प्रत्येक वेळी शब्दशः 'पडदा फाटणे' असा अर्थ होत नाही. अनेकदा हायमेनचा हा त्वचेचा पडदा फक्त ताणला जातो. ज्यामुळे आधी अस...

पर्व 3 - 'सेक्स'वर बोलू काही - भाग 3 - व्हर्जिनिटी (कौमार्य)- 1

इमेज
'लग्नासाठी व्हर्जिन मुलगी हवी' अशी अपेक्षा उद्या लग्नासाठीच्या एखाद्या जाहिरातीत कुणी लिहिलेली दिसली तर त्यात फार काही विशेष वाटू नये इतका या व्हर्जिनिटी बद्दल समाजात दुराग्रह असताना दिसतो. बहुतेक मुलांना व्हर्जिनच मुलगी हवी असते. असे भरपूर मुलं आपण पाहतो कि ज्यांचे स्वतःचे भरपूर मुलींसोबत किंवा वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसोबत अनेकदा लैंगिक संबंध आलेले असतात, पण तरीही त्यांना लग्नासाठी मुलगी मात्र व्हर्जिनच (यांच्या भाषेत -फर्स्ट हँड मालच) हवी असते. बरं ही अवस्था फक्त अशिक्षित, अडाणी मुलांचीच असते असे नाही, तर अगदी शिकले-सवरलेल्या व स्वतःला सुशिक्षित समजणाऱ्या मुलांची आणि त्यांच्या सो कॉल्ड सुशिक्षित, प्रतिष्ठित कुटुंबाची सुद्धा हीच अवस्था असते. आजकाल काही मुलं तर स्पष्टपणे (कि निर्लज्जपणे?) स्वतःच्या जोडीदाराविषयीच्या अपेक्षांमध्ये 'व्हर्जिन मुलगी' हा क्रायटेरिया सांगतात, तेव्हा त्यांच्या बुद्धीची खरंच कीव करावीशी वाटते. लग्नासाठी जोडीदार शोधताना बऱ्याचदा मुलींना मुलांकडून विचारला जाणारा पहिला प्रश्न म्हणजे- याआधी कुणासोबत रिलेशन मध्ये होतीस का? आणि असली...

शेअरिंग-केअरिंग - 30 - '...पण लक्षात कोण घेतंय?'

स्वतःच्या कल्पनेतून आणि स्वतःच्या मेहनतीने तिने एक संस्था सुरू केली. अतिशय निष्ठेने तिने ती संस्था चालवली आणि नावारूपाला आणली. या प्रवासात तिच्यासोबत अनेक सोबती जोडले गेले. त्यांच्यातील काहीजणांवर विश्वासाने तिने काही महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या. त्यांना निर्णयप्रक्रियेत सामावून घेतलं. कामाची पूर्ण मोकळीक दिली. त्यामुळे त्यांनीही या संस्थेमार्फत स्वतःची नवीन ओळख तयार केली. पण पुढे जाऊन एक दिवस त्यांनी तिलाच तिच्या स्वतःच्या कंपनीतूनच बहुमताचा वापर करून बाहेर काढले. त्यामुळे ती खचून गेलीय. तिने स्वतःच्या टॅलेंटवर, हिमतीवर आणि मेहनतीने एका मोठ्या ऍडव्होकेट फर्म मध्ये उच्च पदापर्यंत मजल मारली. अनेक वेगवेगळे रेकॉर्डस् तिच्या नावावर अक्षरशः वकिली जगतात गाजत होते. अनेकजण तिला आयकॉन मानून फॉलो करत होते. तिला दिलेली फर्म ची जबाबदारी सुद्धा ती उत्तमरीत्या पार पाडत होती. अनेक मोठमोठे क्लायंट्स तिने फर्मसोबत जोडले होते व त्यांचा विश्वासही संपादित केलेला होता. एवढे असूनही एक दिवस त्या फर्मचे काही वरीष्ठ अधिकारी तिला मिळणार असणाऱ्या प्रमोशन पासून ठरवून दूर ठेवतात आणि तिच्याकडच्या महत्वाच्या जबाब...

पर्व 3- 'सेक्स'वर बोलू काही- भाग 2 - ('चावट गप्पा' मारण्याची जागा)

सेक्स विषयी अभ्यासपूर्ण बोलणं तर दूरच; पण अनेकदा याविषयी मनातल्या भावना कुठं व्यक्त करणे सुद्धा शक्य होत नाही. म्हणजे मनात आलेले लैंगिक संबंधांविषयी काही विचार, कल्पना, भावना कुणाशी बोलायच्या झाल्या तर तशी सोयच आपल्याकडे उपलब्ध नसते. कारण सेक्स आणि त्यासंबंधीच्या गोष्टी उघड बोलणे म्हणजे 'चावट बोलणे' असं समजून अशा 'चावटपणा'ला आपल्याकडे असभ्यपणाचे लक्षण मानले जाते. तरीही त्यातल्या त्यात पुरुषांना अशा चावट गप्पांसाठी अनेक जागा मिळतात. अनेक पुरुषांना तर याविषयी बोलताना जागेचं सुद्धा भान नसतं किंवा तसं भान बाळगायची गरज त्यांना वाटत नाही. अर्थात हे सगळ्याच पुरुषांना लागू होत नसलं तरी अनेक पुरुषांना तर चावटपणा ही फक्त पुरुषांचीच मक्तेदारी असल्यासारखेही वाटत असते. असे असले तरीही पुरुषांमध्ये सुद्धा अनेकजण समाजातील सभ्यतेचे निकष पाळायचे म्हणून मनातील चावटपणाची ही इच्छा तशीच दाबून ठेवत असतात. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना मात्र अशा विषयावर बोलताना खूपच सावधगिरी बाळगावी लागते. त्यामुळेच मुलांमध्ये किंवा पुरुषांमध्ये सेक्सवर जितक्या मोकळ्या चावट गप्पा होऊ शकतात, तितक्या स्त्रियांच...

शेअरिंग-केअरिंग - 29 - 'साडी'पुराण

आजही बहुतेक ठिकाणी लग्नानंतर मुलींनी साडीच घालायला हवी असे बंधन पाहायला मिळते. शहरात राहणाऱ्या जोडप्यांच्या बाबतीत त्यांनी किमान गावी आल्यावर तरी किंवा गावातील नातेवाईक घरी आल्यावर तरी साडी घालायलाच हवी असे बंधन असते. शिकली-सवरलेली मुलं सुद्धा व्यवस्थित विचार न करता 'मोठ्यांचा मान' या नावाखाली बायकोला याबाबतीत आग्रह करून या बंधनाला एकप्रकारे बळच देत असतात. 'स्त्रिया साडीमध्ये सुंदरच दिसतात' यात काही शंकाच नाही. म्हणूनच अनेक मुलींना व स्त्रियांना हौसेने अनेकदा साडी घालायला आणि अनेक मुलांना व पुरुषांना त्यांना साडीत पाहायला आवडतच असते. पण हीच आवडणारी साडी जेव्हा बंधन म्हणून कायमस्वरूपी वापरायची सक्ती होते, तेव्हा मात्र अनेकींना ती त्रासदायक वाटायला लागते. पूर्वी जेव्हा स्त्रिया या फक्त 'चूल आणि मूल' पुरत्याच मर्यादित होत्या, तेव्हा त्यांना कदाचित असं सतत साडीमध्ये राहणं शक्य होतही असेल; पण सध्याच्या युगात मात्र हे साडीपुराण आता कालबाह्य झालेलं आहे हे लक्षात घ्यायला हवं. खरंतर स्त्रियांनी साडीच घातली पाहिजे हे बंधन नेमक्या काय हेतूने, कोणत्या मानसिकतेने घातलेले असा...