पर्व 3 - 'सेक्स'वर बोलू काही - भाग 17 (हस्तमैथुना संदर्भातील प्रश्न आणि उत्तरे - 1)
1. हस्तमैथुन जास्त वेळा करत असू तर त्यामुळे शिश्नाला काही इजा होऊ शकते का? - आपण हस्तमैथुन कशा पद्धतीने करत आहोत यावर हे अवलंबून असते. म्हणजे हातामध्ये शिश्न धरून शिश्नमुंडावरील त्वचा मागे पुढे करून हस्तमैथुन करत असू तर यामध्ये शिश्नाला काही इजा संभवत नाही; पण अनेकदा आपण जमिनीवर पालथे झोपून हस्तमैथुन करतो. यामध्ये शिश्न जमिनीला घासले जाते. ताठरता आलेले शिश्न जास्त काळ असे जमिनीसोबत घासत राहिलो तर शिश्नाला दुखापत होण्याची शक्यता वाढते. शिश्नमुंड लाल होणे, शिश्नमुंड व शिश्नबंध या भागात आग होणे, प्रचंड जळजळ होणे इथपासून तर हे प्रमाण अगदीच जास्त असेल तर शिश्नाला सूज येऊ शकते, शिश्नबंध किंवा शिश्नमुंड यांना घासून घासून जखमा सुद्धा होऊ शकतात. हेच जर मऊ जागेवर म्हणजे गादीवर, उशीवर पालथे झोपून हस्तमैथुन केले तर हे त्रास होत नाहीत. फक्त सलग खूप जास्त वेळा याच पद्धतीने करत असू तर शिश्नाची जळजळ होऊ शकते. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हाताचा वापर करून हस्तमैथुन करत असलो तरी त्यातही प्रमाण खूप जास्त म्हणजे एकाच दिवसातून अनेकदा हस्तमैथुन करत असू तर शिश्नाची आग होऊ शकते, कधी शिश्नबंधा जवळचा भाग ल...