पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

र. धों. ना आदरांजली

आज र. धों. चा स्मृतीदिन. आजपासून जवळपास शंभर वर्षांपूर्वी र. धों.नी लैंगिकतेविषयी प्रबोधनाची चळवळ सुरू केली. संतती नियमन, गर्भनिरोधक पर्याय, लैंगिक संबंधांबाबतचा खुलेपणा, वेगवेगळ्या लैंगिकता, लैंगिक आरोग्य आणि नग्नता अशा अनेक दुर्लक्षित विषयांवर त्यांनी खूप मेहनतपूर्वक अभ्यासू आणि धाडसी मांडणी केली. लैंगिकतेविषयी बोलणे, लिहिणे हे आजच्या काळात सुद्धा सोपे नाही. ते काम आजपासून शंभर वर्षांपूर्वी त्यांनी केले, यातच त्यांच्या कार्याची उंची दिसून येते. लैंगिकतेसोबतच इतरही अनेक विषयांवर त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद आणि चिकित्सक अंगाने लेखन केले. पण तरीही विशेषकरून लैंगिकता या एकाच विषयाला वाहून घेवून त्यांनी आयुष्यभर काम केले हे विशेष दिसते. लैंगिकतेविषयी खुलेपणाने भूमिका घेणे सोपे नव्हते. त्यासाठी त्यांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागले. नोकरी सोडावी लागली, अन्य वृत्तपत्र/साप्ताहिक/मासिके लैंगिकतेविषयीचे लेख छापायला तयार नाहीत म्हणून शेवटी स्वतःचे मासिक काढावे लागले. मासिकासाठी देणगीदार, प्रकाशक सहजासहजी मिळाले नाहीत. मासिकातून नफा तर सोडाच, पण अनेकदा स्वतःच्याच खिशातून पैसे घालावे ...

शेअरिंग केअरिंग - 36 (...आणि ऑपरेशन च्या दाढेतून मी परत आलो.. भाग ५)

आणि तो दिवस उजाडला... चौथ्या दिवशी सकाळी मी उठलो तेव्हा सकाळच्या राऊंड वरचे एक डॉक्टर मला चेक करायला आले होते. त्यांनीच मला उठवले. कसं वाटतंय विचारलं? मी म्हटलं - एकदम बरा आहे मी आता. काहीच दुखत नाही. - मग त्यांनी बरोबर माझ्या बेंबीवर अंगठा ठेवून मधल्या बोटाने सरळ रेषेत उजव्या बाजूला पोटात दाबले आणि लगेच मी 'दुखतंय' असं त्यांना सांगितलं. 'याचाच अर्थ appendix आहे ना. मग ऑपरेशन केलेलं कधीही चांगलं.' असं म्हणून ते निघाले. मलाही ते पटलं. इतक्यात माझ्या लक्षात आलं की माझं पोट अजूनही साफ झालेलं नाही आणि अंगाला खाज सुद्धा अधूनमधून येतच आहे. लगेच डॉक्टरांना मागे बोलावून मी हे सांगितले. त्यावर एक औषध द्यायला सांगतो असं म्हणून डॉक्टर गेले. त्या औषधाचे नाव ऐकल्यावर मला आठवले की - काल जेव्हा बेड मिळाले नाही म्हणून आम्ही परत घरी गेलो होतो, तेव्हा मी आमच्या ऑफिस च्या कन्सल्टंट डॉक्टरांना मेसेज वर कळवलं होतं की आता मला फक्त पोट साफ न होणे एवढी एकच अडचण राहिलेली आहे. तेव्हा त्यांनी हेच औषध मेसेज मध्ये कळवलेलं होतं. किरण अजून माझ्या जवळच होता. डॉक्टर येवून गेल्यावर लगेच किरण ला मी घरी ज...