पोस्ट्स

मार्च, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नातं तुझं माझं - 2

एक 'आदर्श' नवरा, एक 'आदर्श' बायको आणि त्या दोघांचं 'आदर्श' लग्न - अशी काही चीज या भूतलावर अस्तित्वात नाही. वर्तमानात तशी शक्यता नाही. भविष्यात तर नाहीच नाही. दोन मनांचं मिलन.. दोन शरीरांचं मिलन.. दोन आत्म्यांचं मिलन.. ..या साऱ्या संकल्पना अत्यंत उदात्त, पवित्र वगैरे. पण प्रत्यक्षात बहुदा यातलं काहीच घडत नाही. लग्न ही एक विचारपूर्वक शोधलेली 'संकल्पना' आहे. ठाकूनठोकून आकार देता येईल, आपल्या सोयीनुसार, स्वभावानुसार वाकवून, बदलून घेता येईल अशी एक 'व्यवस्था' म्हणजे लग्न. प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांच्या 'स्पाऊज' पुस्तकात त्यांनी केलेली ही लग्नाची व्याख्या खरंच अंतर्मुख करणारी आहे. ही व्याख्या फक्त लग्न या एकाच नात्यापुरती मर्यादित राहत नाही, तर एकूणच आपल्या आयुष्यातील सर्व आदर्श संकल्पनांचा आपल्याला नव्याने विचार करायला लावते. आपण नेहमीच उगाच काहीतरी आदर्श शोधण्याच्या नादात असतो. प्रत्येकाला आपल्या समोर आदर्श असं काहीतरी हवं असतं. आदर्श विचार, आदर्श विचारवंत, आदर्श साहित्यिक, आदर्श नेता, आदर्श अभिनेता आणि तसंच आदर्श नातं. खरंतर Nothing is Ideal...

नातं तुझं माझं - 1

नातं..  आपलं स्वतःचं स्वतःशी असणारं एक खास नातं.. तसंच दोघांचं परस्परांशी असणारं अनोखं नातं.. एकाचं दुसऱ्याशी असणारं एकतर्फी नातं.. कधी अनेकांचं कुणा एकाशी एकतर्फी असणारं नातं.. कधी एकाचं अनेकांशी असणारं नातं.. तर कधी अनेकांचं एकाशी असणारं नातं.. कधी अनेकांचं अनेकांशी असणारं एकत्रित नातं.. नातं मैत्रीचं.. नातं प्रेमाचं..  नातं आदराचं.. नातं मायेचं.. नातं हसवणारं.. तसं रडवणारं देखील.. काही नाती लळा लावणारी.. तर काही चटका देऊन जाणारी.. काही क्षणिक.. तर काही कायमची सोबत करणारी.. नातं मानवी.. तसं नातं निसर्गातील मानवाशिवाय इतर सजीव-निर्जीव सृष्टीशी सुद्धा.. काही नाती रक्ताची, तर काही प्रीतीची. काही सहज आयती मिळालेली तर काही विशेष कमावलेली. नाती.. हवीहवीशी वाटणारी.. तशीच नकोशी वाटणारी सुद्धा. कधी हे नातं आपल्या आवडीचं असतं.. तर कधी फक्त गरज म्हणून निभवावं लागतं.. आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात अशा अनेक नात्यांचा वाटा असतो. नातं जगताना ते जपावं ही लागतं. ते जपण्यासाठी आपल्याला अनेकदा झुकतं घ्यावं लागतं. नात्यात जेव्हा इच्छेचा अट्टाहास होतो आणि आग्रहातून दुराग्रह जन्माला येतात तेव्हा...

पर्व 3 - 'सेक्स'वर बोलू काही - भाग 23 (समलिंगी (लेस्बियन) स्त्रियांचे मैथुन)

समलिंगी स्त्रियांनाच इंग्लिश मध्ये लेस्बियन (Lesbian) असे म्हणतात. एखाद्या स्त्रीला दुसऱ्या स्त्री विषयी लैंगिक आकर्षण वाटत असेल तर तिला समलिंगी स्त्री किंवा लेस्बियन असे म्हणतात. अशा समलिंगी स्त्रियांना पुरुषांविषयी लैंगिक आकर्षण नगण्य असते. ज्या समलिंगी स्त्रियांना पुरुषांविषयी सुद्धा लैंगिक आकर्षण वाटते, त्यांना उभयलिंगी म्हणजेच बाय सेक्सुअल (Bi-sexual) स्त्रिया असे म्हणतात. समलिंगी स्त्रियांच्या लैंगिक संबंधांत स्पर्श, रोमान्स, मिठी, चुंबन, एकमेकींच्या शरीरांचे घर्षण, हस्तमैथुन व मुखमैथुन हे प्रकार प्रामुख्याने असतात. गुदमैथुन हे कधीतरीच, करून पाहायचे म्हणून, उत्सुकता म्हणून केले जाते. मुळातच स्त्रियांना गुदमैथुन विषयी आकर्षण नसते व त्यातून त्यांना कामपूर्ती सुद्धा मिळत नसते. शिश्न-योनी संबंधांतून मिळणारा आनंद समलिंगी स्त्रिया सेक्स टॉय वापरून सुद्धा मिळवू शकतात. शिश्नाच्या आकाराचे रेडिमेड डिल्डो बाजारात मिळतात. ते हाताने योनीमार्गामध्ये घालून लैंगिक आनंद मिळवता येतो. समलिंगी स्त्रिया आपल्या हाताने एकमेकींच्या योनीमार्गात हा शिश्नाच्या आकाराचा डिल्डो घालून मागे-पुढे करतात. यासाठी ड...