पर्व 3 - 'सेक्स'वर बोलू काही - भाग 23 (समलिंगी (लेस्बियन) स्त्रियांचे मैथुन)

समलिंगी स्त्रियांनाच इंग्लिश मध्ये लेस्बियन (Lesbian) असे म्हणतात. एखाद्या स्त्रीला दुसऱ्या स्त्री विषयी लैंगिक आकर्षण वाटत असेल तर तिला समलिंगी स्त्री किंवा लेस्बियन असे म्हणतात. अशा समलिंगी स्त्रियांना पुरुषांविषयी लैंगिक आकर्षण नगण्य असते. ज्या समलिंगी स्त्रियांना पुरुषांविषयी सुद्धा लैंगिक आकर्षण वाटते, त्यांना उभयलिंगी म्हणजेच बाय सेक्सुअल (Bi-sexual) स्त्रिया असे म्हणतात.
समलिंगी स्त्रियांच्या लैंगिक संबंधांत स्पर्श, रोमान्स, मिठी, चुंबन, एकमेकींच्या शरीरांचे घर्षण, हस्तमैथुन व मुखमैथुन हे प्रकार प्रामुख्याने असतात. गुदमैथुन हे कधीतरीच, करून पाहायचे म्हणून, उत्सुकता म्हणून केले जाते. मुळातच स्त्रियांना गुदमैथुन विषयी आकर्षण नसते व त्यातून त्यांना कामपूर्ती सुद्धा मिळत नसते.
शिश्न-योनी संबंधांतून मिळणारा आनंद समलिंगी स्त्रिया सेक्स टॉय वापरून सुद्धा मिळवू शकतात. शिश्नाच्या आकाराचे रेडिमेड डिल्डो बाजारात मिळतात. ते हाताने योनीमार्गामध्ये घालून लैंगिक आनंद मिळवता येतो. समलिंगी स्त्रिया आपल्या हाताने एकमेकींच्या योनीमार्गात हा शिश्नाच्या आकाराचा डिल्डो घालून मागे-पुढे करतात. यासाठी डिल्डोसहित कमरेला बांधायचे पट्टे सुद्धा मिळतात. एक स्त्री आपल्या कमरेला डिल्डो सह असणारा पट्टा बांधून डिल्डो समोरच्या स्त्री जोडीदाराच्या योनीमार्गात घालून मागे पुढे करते. आळीपाळीने दोघी स्त्री जोडीदार हा पट्टा आपल्या कमरेला बांधून दुसऱ्या जोडीदाराच्या योनीमार्गात घालतात. यामध्ये स्त्री-पुरुषांच्या शिश्न-योनी संबंधांप्रमाणेच अनेक वेगवेगळ्या प्रकारची आसने (positions) ट्राय करता येऊ शकतात. पण अर्थातच असे सेक्स टॉय इतक्या सहजासहजी मिळण्याची सोय आपल्याकडे अजून तरी नाही. त्यामुळे आपल्याकडे अगदी मोजक्याच स्त्री-पुरूषांना सेक्स टॉय वापरण्याचा अनुभव घेता येतो. इतर स्त्रिया बहुतांशी आपल्या हाताची बोटे स्त्री जोडीदाराच्या योनीमार्गात घालून हस्तमैथुन करणे, मुखमैथुन करणे, योनीमार्ग एकमेकींच्या योनीमार्गावर दाबून, मागे पुढे करून, त्यांचे घर्षण करून शिश्नीका उद्दीपित करणे, स्तनांचे मर्दन करणे आणि इतर सर्व शरीरभर स्पर्श करणे, चुंबन घेणे अशा प्रकारे एकमेकींना लैंगिक आनंद मिळवून देत असतात. अनेक स्त्रियांना पुरुषांसोबतच्या लैंगिक संबंधांपेक्षा स्त्रियांसोबतच्या लैंगिक संबंधांत जास्त लैंगिक आनंद व कामतृप्ती मिळते. कारण स्त्रियांचा लैंगिक आनंद नेमका कशात जास्त असतो, हे स्त्रियांनाच जास्त चांगलं माहिती असतं. म्हणूनच त्या शिश्न-योनी संबंधांपेक्षा वरील इतर लैंगिक प्रकारांना जास्त प्राधान्य देत असतात.
अर्थात एका स्त्रीने दुसऱ्या स्रीसोबत लैंगिक संबंधांचा आनंद घेण्यासाठी ती मुळातच समलिंगीच असायला हवी व तिला पुरुषांविषयी आकर्षण असता कामा नये असं मानण्याची काही गरज नाही. एखादी भिन्नलिंगी स्त्री सुद्धा लैंगिक आगळीक म्हणून, सहज उपलब्ध म्हणून, तोही आंनद घेऊन पाहायचा म्हणून आणि पुढे ते आवडले म्हणून अशा कोणत्याही कारणांनी एकमेकींच्या मर्जीने, एकमेकींना लैंगिक आनंदाचा अनुभव देण्यासाठी सुद्धा असे लैंगिक संबंध ठेवू शकतात. त्यात सुद्धा चुकीचे किंवा अनैसर्गिक असे काहीही नसते.

समलिंगी स्त्रिया गुदमैथुनाचा प्रयोग वर म्हटल्याप्रमाणे खूप कमी वेळा करतात. तो करताना सुद्धा डिल्डो उपलब्ध असेल तर डिल्डो च्या साहाय्याने केला जातो. पण तो उपलब्ध असण्याच्या शक्यता कमीच असल्या कारणाने हाताच्या बोटांच्या साहाय्यानेच गुदमैथुन सुद्धा केले जाते.
डिल्डो चा वापर करताना सुद्धा काळजीपूर्वक करणे गरजेचे असते. प्रत्येक वेळी वापरून झाल्यावर डिल्डो साबणाने स्वच्छ धुवून ठेवणे गरजेचे आहे. काही इलेक्ट्रिक डिल्डो पाण्याने धुवून चालत नाहीत. त्यामुळे डिल्डो सोबत दिलेली स्वच्छतेविषयीची माहिती काळजीपूर्वक वाचून तशी दक्षता घ्यावी लागते. प्रत्येक स्त्री जोडीदाराने स्वतःचा स्वतंत्र डिल्डो वापरणे जास्त सुरक्षेचे असते. एकच डिल्डो शेअर करण्यातून लैंगिक आजारांचा संसर्ग होण्याची शक्यता असते. डिल्डो योनीमार्गात घालण्याआधी त्याला कुठे कट वगैरे गेलेला नाहीये ना याची सुद्धा हाताने खात्री करून घ्यावी. शक्यतो डिल्डो वर कंडोम चढवूनच तो योनीमार्गात घालावा व प्रत्येक वापरावेळी कंडोम बदलावा. काही महिला जर कुठून चुकीची माहिती मिळाल्यामुळे डिल्डो किंवा इतर सेक्स टॉय ऐवजी इतर काही वस्तू योनीमार्गात घालण्याचा प्रयोग करत असतील तर ते जास्त हानिकारक असू शकते. त्या वस्तूंवरील बॅक्टेरिया मुळे जंतुसंसर्ग होऊन लैंगिक आजार होऊ शकतात. योनीमार्गात जखमा होऊ शकतात व अशा जोडीदारासोबत योनीमैथुन, हस्तमैथुन किंवा मुखमैथुन करणाऱ्या दुसऱ्या स्त्री जोडीदाराला सुद्धा यामुळे संसर्ग होवू शकतो. त्यामुळे अशा इतर कोणत्याही वस्तू योनीमार्गात घालू नये.
समलिंगी पुरुषांप्रमाणेच समलिंगी स्त्रियांना सुद्धा समाजात सहज स्विकारले जात नाही. उलट मुळातच आपल्याकडे स्त्रियांबाबत असणाऱ्या अधिक बंदिस्त वातावरणामुळे अनेक स्त्रिया आपली ही वेगळी लैंगिक ओळख लपवून ठेवतात. जमलंच तर अगदी लपूनछपूनच काही स्त्रिया असे संबंध ठेवू पाहतात. अशा स्त्रियांचे जेव्हा सामाजिक दडपणाखाली भिन्नलिंगी पुरूषांसोबत लग्न होते, तेव्हा त्यांच्यासाठी त्या पुरुष जोडीदारासोबतचे लैंगिक संबंध हे फक्त एक रीत म्हणून व जोडीदाराला संशय येऊ नये म्हणून मन मारून केले गेलेले संबंध असतात. विवाहांतर्गत होणाऱ्या सक्तीच्या समाजमान्य बलात्काराच्या त्यासुद्धा कायमच्या बळी ठरतात. अशा स्त्रियांना पुढे मुलं ही होऊ शकतात व समाजाच्या दृष्टीने त्या भिन्नलिंगी म्हणून वावरू ही शकतात; पण त्यांचे स्वतःचे लैंगिक सुख मात्र कधीच हरवलेले असते. अर्थात सर्वच स्त्रियांना हे संबंध असे पुढे निभावणे जमतेच असंही नाही. काही अंशी किंवा पूर्ण उभयलिंगी असणाऱ्या स्त्रियांसाठी हे तुलनेने सोयीचे असू शकते; पण पूर्ण समलिंगीच असणाऱ्या स्त्रियांना असे संबंध जास्त काळ रेटणे शक्य होत नाही. अशा वेळी मग नाते तुटण्याची शक्यता जास्त असते किंवा मग दोघाही स्त्री-पुरूष जोडीदारांना आयुष्यभर लैंगिक घुसमट सहन करत जगावे लागते.
समाज म्हणून या गोष्टीचा गांभिर्याने विचार करत सर्व समलिंगी स्त्री-पुरूष व इतरही सर्व लैंगिकतेच्या व्यक्तींना समाजात सन्मानाने जगता येईल असे वातावरण तयार करायला हवे. या लैंगिकता सुद्धा भिन्नलिंगी आकर्षण असणाऱ्या स्त्री-पुरुषांइतक्याच नैसर्गिक असतात हे समजून घेऊन मान्य करायला हवे. प्रत्येकाला आपापल्या लैंगिकतेसह जगण्याचा व कुणाला त्रास न देता आपापला लैंगिक आनंद घेण्याचा पूर्ण अधिकार आहे हे आतातरी आपण स्विकारायला हवे.

- सचिन थिटे (8424041159)
(आपल्या प्रतिक्रिया, मत, अनुभव नक्की व्हाट्सअप्प करा.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध