लैंगिक संबंध

*लैंगिक संबंध ही आयुष्यातील अतिशय महत्त्वाची आणि तेवढीच आनंददायी असणारी गोष्ट.*
*विवाह या एका संकल्पनेमुळे त्यावर आलेली अनेक बंधनं, त्याचवेळी या आनंददायी कृतीसाठी एक हक्काचा जोडीदार मिळणं, पण यामुळेच अनेकदा त्यातून एकाच व्यक्तीवर लैंगिक सबंधांसाठी येणारे बंधन, अपेक्षा व जबरदस्ती*

कधी स्वतःची, तर कधी स्वतःकडून असणारी समोरच्याची लैंगिक इच्छा, अपेक्षा पूर्ण न होण्याने येणारे नैराश्य व ताणतणाव यात ग्रासलेली अनेक माणसं...

जोडीदाराने स्वतःच्या लैंगिक आनंदासाठी इतरत्र शोधलेले मार्ग व यातून दुसऱ्या जोडीदाराला होणारा त्रास..

जोडीदारांमध्ये एकमेकांवर संशय घेण्याचेही एक मोठे कारण म्हणजे लैंगिक संबंधच..

तर कधी जोडीदाराने स्वतःच स्पष्टपणे इतरत्र पर्याय शोधायला सांगूनही तसा खात्रीचा पर्याय उपलब्ध नसल्याने असणारी अस्वस्थता..

कधी जोडीदाराला इतरत्र पर्याय शोधायला सांगणं, त्याला/तिला तो भेटणं, त्यांनी तो एन्जॉय करणं; पण ते करत असताना जोडीदाराकडे दुर्लक्ष होणं आणि त्यातून पुन्हा नात्यात ताण तणाव येणं..

कधी दोघांपैकी एका जोडीदाराला हवा तसा पर्याय मिळणं आणि त्यांनी तो एन्जॉय करणं; पण त्याचवेळी दुसऱ्या जोडीदाराला पर्याय न मिळणं आणि त्यातून त्यांची अस्वस्थता अजूनच वाढत जाणं..

कधीतरीच दोघाही जोडीदारांची लैंगिक इच्छा/अपेक्षा जुळणं आणि त्यातून दोघांनाही आनंद मिळणं..

तर कधी, म्हणजे अगदीच कधीतरी, पण असं घडणं - जिथं दोन्ही जोडीदारांनी मनापासून एकमेकांचे लैंगिक स्वातंत्र्य स्वीकारलेले असणे, दोघांनाही तसे योग्य पर्याय मिळणं, दोघांनीही ते एन्जॉय करणं, ते करत असताना तरीही एकमेकांची बाँडिंग कमी न होता उलट अधिकच घट्ट होत जाणं आणि दोघांनीही आपापलं स्वतंत्र जग एन्जॉय करत असतानाच एकमेकांसोबत सुद्धा जगण्याची मजा अनुभवणं..

असे अनेक आयाम असणारे हे लैंगिक संबंध..

खरंतर प्रत्येकाच्या आयुष्यात अधिक आनंद आणू शकणारे पण तरीही आपणच आपल्यावर घालून घेतलेल्या अनावश्यक बंधनांमुळे बहुतांशी लोकांच्या आयुष्यात नैराश्य आणणारे..

*लैंगिक संबंध* याच विषयावर झालेल्या परवाच्या मैत्री कट्ट्यामध्ये अनेक मुद्द्यांवर खूप छान चर्चा झाली. इतक्या संवेदनशील विषयावर व्यक्त होत असताना अडचणी येतील असं वाटत असतानाच अनेकांनी मोकळेपणाने केलेला संवाद, पुरुषांपेक्षा सुद्धा मोठ्या संख्येने असणारा महिलांचा सहभाग. या सर्व गोष्टी या विषयाची गरज सिद्ध करणाऱ्या आणि त्याचवेळी आपल्याकडून अनेकांच्या असणाऱ्या अपेक्षा व विश्वास दाखवून देणाऱ्या होत्या. कट्ट्याच्या या यशस्वी सत्राने नवीन पर्वात खास *'मैत्री प्रेम आकर्षण लग्न सेक्स नाती'* या विषयांवर होणाऱ्या पुढच्या सत्रांसाठी अधिक विश्वास आणि बळ दिले आहे.

यासाठी सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच सोबत जोडून राहू आणि संवादाची दारं खुली करत राहू..

- सचिन (8424041159)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)