पोस्ट्स

एप्रिल, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पर्व 4 - सेक्स वर बोलू काही - भाग 8 (सेक्स & रिलेशन्स - 2)

कुणालचे मायरा वर प्रेम होते. मायराच्या मनात सुद्धा कुणाल बाबत सारख्याच भावना होत्या. दोघांनाही लग्न नावाच्या बंधनात अडकण्याची गरज वाटत नव्हती किंवा त्याबाबत दोघांपैकी कुणीही आग्रही नव्हते. लग्नाचा विचार करण्याची अगदीच गरज पडत नाही तोपर्यंत त्यात पडायचे नाही असेच दोघांचेही मत होते. कुणाल चे महक सोबत असणारे सेक्स रिलेशन मायरा ला माहिती होते आणि तिला ते मान्य सुद्धा होते. कुणाल, महक, मायरा, समीर हे चौघेही एकमेकांचे फ्रेंड्स होते. मुळातच हे चौघेही तेवढे मॅच्युअर, एकमेकांची स्पेस जपणारे आणि सेक्सच्या बाबतीत ओपन दृष्टीकोन ठेवणारे होते. सेक्स रिलेशन आणि इमोशनल रिलेशन यांमध्ये फरक असतो हे त्यांना पूर्णपणे मान्य होते. त्यामुळेच मायराचे सुद्धा समीर सोबत असणारे सेक्स रिलेशन कुणालला माहिती होते आणि त्यावर त्याला काहीच आक्षेप नव्हता. दोघांच्याही आपल्या दुसऱ्या मित्र मैत्रिणींसोबत असणाऱ्या या सेक्स रिलेशन वर दोघांनाही आक्षेप नव्हता. त्याचवेळी महक आणि समीर यांना सुद्धा कुणाल आणि मायराचे एकमेकांबद्दलचे प्रेम माहिती होते आणि मान्य सुद्धा होते. चौघांमध्येही असणाऱ्या या नात्याचा कुणालाही काहीच प्रॉब्लेम ...

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही - भाग 7 (सेक्स & रिलेशन्स)

ते दोघे फ्रेंड्स होते. कामानिमित्त एकत्र आले. एके दिवशी काही वेळ एकत्र घालवल्यानंतर एका क्षणी दोघेही मूड मध्ये असताना एकमेकांच्या जवळ आले आणि संगनमताने सेक्स एन्जॉय केला. दुसऱ्या दिवशी दोघांच्याही मनात हा गिल्ट राहिला की आपण समोरच्यावर जबरदस्ती तर नाही केली? म्हणजे जरी संगनमताने सेक्स केला असला आणि त्यात आपल्याला आनंद मिळाला असला, तरी तिला/त्याला ते नक्की ते मनापासून करायचे असेल का? की आपण सुरूवात केली आणि त्याला/तिला नाही म्हणता न आल्याने पुढे सगळं झालं असेल? दोघांच्याही मनात असणारा हा गील्ट दुसऱ्या दिवशी दोघांनी एकमेकांशी बोलून दाखवला. त्यावेळी दोघांनाही हे सारखेच आवडले असल्याचे कळले. त्यामुळे दोघेही खुश झाले. पण त्याचवेळी या रिलेशन चा अर्थ कमिटमेंट किंवा प्रेम किंवा इमोशनल रिलेशन म्हणून तर घेणार नाही ना? अशी भीती त्याच्या मनात होतीच. ती त्याने तिला बोलून दाखवली. पण तिने  लगेच स्पष्टपणे सांगितलं की तिच्या मनात असं काहीही नाही आणि हा फक्त सेक्स आहे, जो दोघांनाही आवडलं म्हणून आपण केलाय. यात कुणीच कुणाला गुंतवून ठेवायचा किंवा गुंतायचा प्रश्न नाही. तिचं हे मत ऐकून त्याला सुद्धा खूप स...

पर्व 4 - सेक्स वर बोलू काही - भाग 6 (वीर्याचा वास येतोय? Do you smell semen?)

अनेकदा पुरुषांच्या वीर्यमुक्ती नंतर वीर्याला अतिशय तीव्र दुर्गंध येतो. जर असा वास तुमच्या किंवा तुमच्या जोडीदाराच्या वीर्याचा येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. आजच्या लेखात आपण याच विषयी थोडे अधिक जाणून घेऊयात. पुरुषांचे वीर्य हे अनेक प्रकारच्या घटकांचे मिश्रण असते. यात सर्वाधिक वाटा हा पाण्याचा असतो. म्हणूनच अनेक वेळा वीर्याला अजिबात वास जाणवत नाही. पाण्याबरोबरच फ्रुक्टोज हा घटक सुद्धा वीर्यामध्ये मुबलक प्रमाणात असतो, जो वीर्यामधील शुक्राणूंना ऊर्जा देण्यात तसेच वीर्याची गती व चिकटपणा वाढवण्यात मदत करतो. फ्रुक्टोज मुळे सामान्यतः पुरुषांच्या वीर्याला एक विशिष्ट प्रकारचा हलकासा वास येतो. हा वास काही प्रमाणात एखाद्या गोड पदार्था सारखा किंवा साखरेसारखा असतो. या वासाला इंग्रजीमध्ये Sugary smell (शुगरी स्मेल) असेही म्हणतात. वीर्यामधील pH चे प्रमाण आणि वीर्यामध्ये असणारे सायट्रिक ऍसिड, कॅल्शियम, मॅग्नेशियम यांसारखे घटक सुद्धा वीर्याला येणाऱ्या वासामध्ये कारणीभूत असतात. या सर्व घटकांचे प्रमाण कमी जास्त झाले की त्यानुसार वीर्याच्या वासात सुद्धा बदल होवू शकतो. म्हणूनच वीर्याच्या वासाचे प्रम...