पर्व 4 - सेक्स वर बोलू काही - भाग 8 (सेक्स & रिलेशन्स - 2)

कुणालचे मायरा वर प्रेम होते. मायराच्या मनात सुद्धा कुणाल बाबत सारख्याच भावना होत्या. दोघांनाही लग्न नावाच्या बंधनात अडकण्याची गरज वाटत नव्हती किंवा त्याबाबत दोघांपैकी कुणीही आग्रही नव्हते. लग्नाचा विचार करण्याची अगदीच गरज पडत नाही तोपर्यंत त्यात पडायचे नाही असेच दोघांचेही मत होते.
कुणाल चे महक सोबत असणारे सेक्स रिलेशन मायरा ला माहिती होते आणि तिला ते मान्य सुद्धा होते. कुणाल, महक, मायरा, समीर हे चौघेही एकमेकांचे फ्रेंड्स होते. मुळातच हे चौघेही तेवढे मॅच्युअर, एकमेकांची स्पेस जपणारे आणि सेक्सच्या बाबतीत ओपन दृष्टीकोन ठेवणारे होते. सेक्स रिलेशन आणि इमोशनल रिलेशन यांमध्ये फरक असतो हे त्यांना पूर्णपणे मान्य होते. त्यामुळेच मायराचे सुद्धा समीर सोबत असणारे सेक्स रिलेशन कुणालला माहिती होते आणि त्यावर त्याला काहीच आक्षेप नव्हता. दोघांच्याही आपल्या दुसऱ्या मित्र मैत्रिणींसोबत असणाऱ्या या सेक्स रिलेशन वर दोघांनाही आक्षेप नव्हता. त्याचवेळी महक आणि समीर यांना सुद्धा कुणाल आणि मायराचे एकमेकांबद्दलचे प्रेम माहिती होते आणि मान्य सुद्धा होते. चौघांमध्येही असणाऱ्या या नात्याचा कुणालाही काहीच प्रॉब्लेम नव्हता; उलट त्याची त्या सर्वांना मदतच जास्त होत होती.
कुणाल आणि मायरा हे दोघेही उच्चशिक्षित आणि चांगल्या नोकऱ्या मिळवून सेटल झालेले होते. आयुष्यातील कोणतीही गोष्ट विचारपूर्वक स्विकारायला हवी या मताचे ते होते. एकाच दिशेने असणारी एकमेकांची विचारसरणी पाहूनच दोघेही एकमेकांकडे आकर्षित झाले होते. अनेक दिवस मैत्रीच्या नात्यात असताना दोघांनीही एकमेकांसोबत विचारांची भरपूर घुसळण केलेली होती. याच दरम्यान समीर आणि महक सुद्धा त्यांच्यासोबत जोडले गेले होते. लग्न या विषयावर सुद्धा या सर्वांच्या अनेकदा चर्चा झाल्या होत्या. प्रेम, लग्न, सेक्स या सर्व मुद्द्यांवर ही चौकडी आपल्या मित्र मैत्रिणींमध्ये सुद्धा मोकळेपणाने बोलत असायची. यातूनच त्यांच्या या संदर्भातील संकल्पना अधिक स्पष्ट होत गेल्या. "कोणत्याही नात्यामध्ये एकमेकांचे स्वातंत्र्य मान्य असणे खूप गरजेचे असते. हे स्वातंत्र्य अनेक प्रकारचे असते. ज्यामध्ये आर्थिक, भावनिक, वैचारिक स्वातंत्र्यासोबतच आचार स्वातंत्र्य, आहार स्वातंत्र्य, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य, तसेच लैंगिक संबंधांबाबतचे स्वातंत्र्य सुद्धा महत्त्वाचे असते. एखाद्याला स्वतःच्या मर्जीने एखाद्यासोबत लैंगिक संबंध ठेवायचे असतील आणि समोरची व्यक्ती सुद्धा यासाठी इच्छुक किंवा तयार असेल, तर ते संबंध ठेवण्याचे स्वातंत्र्य त्या व्यक्तींना असायला हवे. त्याचबरोबर एखाद्याला समोरच्याशी लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा नसेल तर मग ती समोरची व्यक्ती कोणीही असली तरी तिने त्यासाठी कोणत्याही प्रकारची जबरदस्ती किंवा दुराग्रह करता कामा नये." हे या चर्चांमधून निघालेले आणि सर्वांना मान्य असणारे वैचारिक सार होते.
(क्रमशः)

- सचिन थिटे (8424041159)
(आपले मत, प्रतिक्रिया, अनुभव, सूचना नक्की कळवत राहा.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध