विवाहबाह्य संबंध (ExtraMarital Affairs) - Part 2
आपली परवाची पोस्ट फक्त दोनच दिवसांत बघता बघता 65000 लोकांपर्यंत पोहचली आणि अजूनही तिचा वेग थांबलेला नाही. यावरूनच विवाहबाह्य संबंध (ExtraMarital Affairs) या विषयी बोलण्याची समाजात असलेली गरज जाणवते. या विषयावर बोलावं, चर्चा करावी असं अनेकांना वाटत असतं. पण अनेकजण हा विषय जरी काढला तरी ज्या टोकाच्या नकारात्मक पद्धतीने व्यक्त होतात व असा विषय काढणाऱ्याच्या बाबतीत इतका चुकीचा समज केला जातो व पसरवला जातो की त्यामुळेच उघडपणे कुणी या विषयावर बोलण्याची हिम्मत करत नाही. कालच्या पोस्टवर फेसबुकवर आलेल्या कमेंट वर सुद्धा जर एक नजर फिरवली तरी अनेकांच्या मानसिकतेचा अंदाज येतो. अशा विषयावर बोलणारी स्त्री दिसली की ती 'तसलीच असावी' असं समजून तिला लगेच तसे मेसेज करणारे महाशय सुद्धा यात दिसतील. अशा विषयावर बोलणाऱ्या स्त्रियांच्या इनबॉक्स मध्ये शिरून ट्राय मारायला बघणारे महाभाग पण यात दिसतील आणि उघडपणे अशा प्लॅटफॉर्म वर बाकी विषय सोडून फक्त सेक्सची डिमांड करणारे बिच्चारे पण दिसतील. हे सगळीकडे फक्त हेच करत असतात. ते तरी काय करणार बिचारे? त्यांची पूर्ण न होणारी सेक्स ची इच्छा ते असे जिथे जिथे शक्य ...