विवाहबाह्य संबंध (ExtraMarital Affairs) - Part 2

आपली परवाची पोस्ट फक्त दोनच दिवसांत बघता बघता 65000 लोकांपर्यंत पोहचली आणि अजूनही तिचा वेग थांबलेला नाही. यावरूनच विवाहबाह्य संबंध (ExtraMarital Affairs) या विषयी बोलण्याची समाजात असलेली गरज जाणवते. या विषयावर बोलावं, चर्चा करावी असं अनेकांना वाटत असतं. पण अनेकजण हा विषय जरी काढला तरी ज्या टोकाच्या नकारात्मक पद्धतीने व्यक्त होतात व असा विषय काढणाऱ्याच्या बाबतीत इतका चुकीचा समज केला जातो व पसरवला जातो की त्यामुळेच उघडपणे कुणी या विषयावर बोलण्याची हिम्मत करत नाही. कालच्या पोस्टवर फेसबुकवर आलेल्या कमेंट वर सुद्धा जर एक नजर फिरवली तरी अनेकांच्या मानसिकतेचा अंदाज येतो. अशा विषयावर बोलणारी स्त्री दिसली की ती 'तसलीच असावी' असं समजून तिला लगेच तसे मेसेज करणारे महाशय सुद्धा यात दिसतील. अशा विषयावर बोलणाऱ्या स्त्रियांच्या इनबॉक्स मध्ये शिरून ट्राय मारायला बघणारे महाभाग पण यात दिसतील आणि उघडपणे अशा प्लॅटफॉर्म वर बाकी विषय सोडून फक्त सेक्सची डिमांड करणारे बिच्चारे पण दिसतील. हे सगळीकडे फक्त हेच करत असतात. ते तरी काय करणार बिचारे? त्यांची पूर्ण न होणारी सेक्स ची इच्छा ते असे जिथे जिथे शक्य होईल तिथे व्यक्त करून पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्याबाबत सहानुभूतीने जरी विचार करायचा म्हटलं तरी त्यांची ही पद्धत मात्र सपशेल चुकीची आहे हे त्यांना कळायला हवे. त्यांच्या या अतृप्त इच्छेसाठी इतर योग्य मार्ग शोधायला हवा. आपल्यामुळे इतर कुणाला थेट त्रास होणार नाही, याचे भान सर्वांनीच ठेवायला हवे हेही त्यांना स्पष्ट सांगायलाच हवे. हे असेच अनुभव मला इतरही अनेक व्हॉट्सॲप, फेसबुक, टेलिग्राम ग्रुप व काही डेटिंग ॲप वर सुद्धा पाहायला मिळाले आहेत. यातून एकूणच लैंगिक अस्वस्थता कोणत्या टोकाला पोहचली आहे हेसुद्धा आपल्या लक्षात येते.

अनेकदा अशा महाभागांमुळे आणि बिच्चाऱ्यांमुळेच सेक्स किंवा लैंगिकतेच्या संदर्भात जाहीर ओपन प्लॅटफॉर्म वर चर्चांना अडचणी येतात. विशेषतः स्त्रिया बऱ्याचदा मग अशा ठिकाणी व्यक्त होणे टाळतात. कदाचित यातल्या काही महाभागांना हेच हवे असेल सुद्धा. त्यासाठी सुद्धा जाणीवपूर्वक ते अशा ठिकाणी स्त्रियांना टार्गेट करत असावेत. जेणेकरून त्या स्त्रीने परत कधी या विषयावर जाहीरपणे बोलू नये. पण आता यांची इच्छा इतकीही सहजासहजी पूर्ण होईल अशी परिस्थिती नाहीये. स्त्रियांना सुद्धा आता कुणाकडे दुर्लक्ष करायचे आणि कुणाला महत्त्व द्यायचे हे चांगले लक्षात येत आहे. त्यामुळे अशा प्रकारांना भाव न देता आणि न घाबरता व्यक्त होत राहणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण आता वाढत आहे ही चांगलीच गोष्ट आहे.

मुळात या सर्व कमेंट्स मधून मूळ पोस्टमध्ये विचारलेल्या प्रश्नाला मिळालेल्या काही मोजक्या उत्तरांवरून आणि एकूणच इतर सर्व कमेंट्स वरून हे तर लक्षात आले की - विवाहबाह्य संबंध (ExtraMarital Affairs) होण्यामागची पोस्टमध्ये दिलेल्या कारणांव्यतिरिक्त इतर फार कारणे आलेली नाहीत. जी आली, ती कुठेतरी दिलेल्या पर्यायांमध्येच फीट बसणारी आहेत. अजून पुढे आलीच, तर त्यावरही आपण त्या त्या वेळी बोलूच.

मुळातच अशा संबंधांना विरोध करणाऱ्यांमध्ये यामागच्या कारणांचा विचारही न करता थेट विरोध करण्यावरच भर देणारे जास्त दिसतात. त्यामुळेच याच्या मुळाशी जाणे अनेकांना शक्य होत नाही.

या विषयावर आपण मात्र पुढे अधिक सखोल आणि वेगवेगळ्या अंगांनी चर्चा करत राहू आणि याचे वेगवेगळे पदर उलगडत जावू. हे करत असताना आपण आपल्याच याविषयीच्या संकल्पना पुन्हा एकदा तपासून पाहू. मोकळेपणाने या संवादात, चर्चेत सहभागी होवू. आधीची मनात फिट असणारी पूर्व गृहितके बाजूला ठेवून नव्याने आपल्या मनाची कवाडे उघडी ठेवत या विषयावर विचार करू. इतरांचे वाचू, समजून घेवू आणि सोबत आपलेही म्हणणे संयतपणे मांडत राहू.

त्यासाठीच सर्वांनीच या चर्चेमध्ये सहभागी होवून आपला हेल्दी सहभाग देत रहावा. ज्यांना फेसबुकवर थेट बोलणे शक्य नाही, त्यांनी व्हॉट्सॲप वर मेसेज करून आपले मत व्यक्त केले तरी चालेल.

आपले मत, अनुभव, प्रतिक्रिया, शंका, सूचना, प्रश्न या सर्वांचे स्वागतच आहे.

- सचिन (8424041159)

(फोटो गुगल वरून घेतलेले आहेत.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध