पोस्ट्स

जानेवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पर्व 3 - 'सेक्स' वर बोलू काही - भाग 20 - मुखमैथुन

हस्तमैथुना प्रमाणेच मुखमैथुन व गुदमैथुन हे सुद्धा शिश्न-योनी संबंधांना पर्याय म्हणून वापरले जाणारे लैंगिक संबंधांचे प्रकार आहेत. अर्थात हस्तमैथुन व मुखमैथुन हे शिश्न-योनी संबंधांकरता एकमेकांना उत्तेजित करण्यासाठी व शिश्न-योनी संबंधांतील मजा अधिक वाढवण्यासाठी सुद्धा वापरले जाणारे पर्याय आहेत. समलिंगी संबंधांमध्ये मुखमैथुन व गुदमैथुन हेच पर्याय जास्त प्रमाणात वापरले जातात. मुखमैथुन मध्ये शिश्न-मुख मैथुन व योनी-मुख मैथुन असे दोन प्रकार पडतात. शिश्न-मुख मैथुन मध्ये पुरूष जोडीदाराचे शिश्न स्त्री किंवा पुरूष जोडीदाराकडून तोंडामध्ये घेऊन शिश्नमुंडावरील त्वचा हाताने मागे पुढे केली जाते आणि शिश्नमुंडाचे चुषण केले जाते. शिश्नबंधावर ओठांनी दाब देणे, आपले तोंड मागे पुढे हलवत ओठांनी शिश्नाचे मर्दन करणे किंवा पुरूषानेच आपले शिश्न समोरच्या जोडीदाराच्या तोंडात मागे पुढे करणे अशा वेगवेगळ्या प्रकारे एकमेकांना उत्तेजित केले जाते. उत्तेजित झाल्यानंतर काहीजण ताठरता आलेले शिश्न स्त्री जोडीदाराच्या योनीमार्गात घालून शिश्न-योनी संबंध करतात; तर काहीजण पुरूषाची वीर्यमुक्ती होईपर्यंत मुख-मैथुन करतात व मग वीर्य स...

पर्व 3 - 'सेक्स'वर बोलू काही - भाग 19 (हस्तमैथुना संदर्भातील प्रश्न आणि उत्तरे - 3, 4, 5)

3. हस्तमैथुन केल्यानंतर मला काही काळ अशक्तपणा आल्यासारखे जाणवते. हे कशामुळे होत असेल? जास्त हस्तमैथुन केल्यामुळे खरंच अशक्तपणा येतो का? - हस्तमैथुन केल्यामुळे कधीही कुणालाही अशक्तपणा येत नाही, येऊ शकत नाही. उलट हस्तमैथुन केल्यामुळे एक रिलॅक्सेशनची भावना मनात येते. शरीरातील हार्मोन सिक्रेशन मुळे शरीरात सुद्धा एक सुखद अनुभव तरळू लागतो. शरीर थंडगार पडल्यासारखा सुखद अनुभव काहींना येतो. अशा वेळी मेंदूतून स्रवणारे हार्मोन्स सुखद भावना सर्व शरीरभर पसरवतात व सर्व शरीर हलके हलके झाल्यासारखे काही क्षण जाणवतं. सर्वच वयाच्या स्त्री-पुरुषांना हे अनुभवास येऊ शकतं. ही सुखद अनुभूती असते; पण आपल्या मनात हस्तमैथुन विषयी भिती किंवा नकारात्मक भावना असेल तर या सर्व अनुभवांकडे नकारात्मक पाहिलं जाऊ शकतं व त्यामुळे हलकं हलकं वाटणारं शरीर अशक्तपणा मुळेच वाटतंय कि काय? असा समज होऊ शकतो. प्रत्यक्षात तसं काहीही नसतं. हस्तमैथुन केल्यानंतर रक्तातील हिमोग्लोबिन कमी झालं किंवा वजन कमी झालं अशी कोणतीही उदाहरणे प्रत्यक्षात नाहीत. त्यामुळे कोणत्याही वयातील मुलं-मुली, स्त्री-पुरुष कुणालाही हस्तमैथुन केल्याने अशक्तपणा वगै...

पर्व 3 - 'सेक्स'वर बोलू काही - भाग 18 (हस्तमैथुना संदर्भातील प्रश्न आणि उत्तरे - 2)

*हस्तमैथुन साधारण किती वेळा करणे म्हणजे नॉर्मल? याचे काही प्रमाण आहे का? मला दोन दिवसांतून किंवा कधी दररोज इच्छा होत असते हे प्रमाण अति आहे का?* - हस्तमैथुन किती दिवसांतून एकदा करावे किंवा एका दिवसात किती वेळा करावे याचे असे काहीच प्रमाण ठरलेले नसते. हे प्रमाण बदलते असते. कधी ते दोन तीन दिवसांतून एखाद्या वेळी तर कधी एकाच दिवसात दोन चार वेळा किंवा त्यापेक्षा जास्त वेळाही केले जाऊ शकते. हे सगळं त्या त्या वेळी उपलब्ध असणारी वेळ, सोयीची जागा, एकांत, आपला मूड, मनात येणारे विचार आणि शरीराची तशी तयारी असणे म्हणजे हार्मोन सिक्रेशन होणे व मुलांच्या बाबतीत शिश्नात ताठरता येणे यावर अवलंबून असते. आपल्या इच्छेनुसार प्रत्येक वेळी आपण हस्तमैथुन करूच शकू असंही काही नसतं. कारण त्यासाठी शरीर तयार असणं म्हणजे शिश्नात ताठरता येणं गरजेचं असतं आणि शिश्नाची ताठरता ही आपल्या मागणीनुसार येत नसून ती शरीरातील हार्मोन सिक्रेशन नुसार येत असते. स्त्रियांच्या बाबतीत जरी हस्तमैथुनासाठी अशा ताठरतेची गरज नसली तरी जोपर्यंत शरीरात हार्मोन्स सिक्रेट होत नाहीत तोपर्यंत हस्तमैथुनाचा आनंद घेताच येत नाही. त्यामुळे जेव्हा जेव्...