पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 1 - अग्गंबाई अरेच्या आणि पुढे...)
आत्तापर्यंत 'ती, तो आणि लैंगिक संबंध', 'मुक्त लैंगिकतेच्या दिशेने', 'सेक्स वर बोलू काही' या काही लेखमालांचे लेखन झाले. त्यातूनच आपले 'अग्गंबाई! अरेच्या!!' हे पुस्तक सुद्धा तयार झाले. अर्थात अग्गंबाई अरेच्या पुस्तकात मुक्त लैंगिकतेच्या दिशेने फार मांडणी केलेली नसून जास्त भर हा लैंगिक संबंध व लैंगिक अवयव यांविषयी प्राथमिक किमान आवश्यक असणारी माहिती पोचवणे आणि यांविषयी असणाऱ्या अनेक गैरसमजांपैकी शक्य तितके गैरसमज दूर करणे हा मुख्य उद्देश ठेवून लिहिले आहे. आता हे पुस्तक जवळपास आपल्या सर्वांच्या हातात पोहचलेही असेल. हे पुस्तक तयार होइपर्यंत मी फेसबुक पेज वर आणि ब्लॉग वर केलेले लेखन व पुस्तकाच्या निमित्ताने थेट पुस्तकात लिहिलेले काही लेख असे मिळून 'अग्गंबाई अरेच्या' तयार झाले. यात अर्थात अजून बरंच काही लिहिणे बाकी आहे. पुस्तक येईपर्यंत आधीच्या लेखांसंदर्भात वाचकांच्या आलेल्या अनेक प्रतिक्रिया आणि पुस्तक पोचल्यावर ते वाचून आलेल्या अनेक प्रतिक्रिया आणि त्यातून समोर आलेले विषय. असं बरंच काही अजून लिहायचं आहे. या पुस्तकातील लेखन हे वयात आलेल्या मुला-मुलीं...