पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पर्व 3 - 'सेक्स'वर बोलू काही- भाग 22 (समलिंगी (गे) पुरूषांचे गुदमैथुन)

भिन्नलिंगी आकर्षण असणाऱ्या स्त्रिया व पुरुष यांच्या गुदमैथुन विषयी आपण मागच्या लेखात पाहिलं. आता समलिंगी पुरुषांच्या गुदमैथुन विषयी जाणून घेऊयात. समलिंगी पुरुषांनाच इंग्लिश मध्ये 'गे' (Gay) असे म्हणतात. एखाद्या पुरुषाला दुसऱ्या पुरुषांबद्दल लैंगिक आकर्षण असेल, तर त्याला समलिंगी पुरूष किंवा गे असे म्हणतात. अशा पुरूषांना स्त्रियांविषयी लैंगिक आकर्षण नगण्य असते. ज्या समलिंगी पुरूषांना स्त्रियांविषयी सुद्धा लैंगिक आकर्षण असते त्यांना उभयलिंगी पुरूष म्हणजेच बाय सेक्सुअल (Bi-sexual) असे म्हणतात. समलिंगी पुरुषांमध्ये लैंगिक संबंधांत जरी प्राधान्याने गुदमैथुन जास्त प्रमाणात करत असले तरी गुदमैथुन बरोबरच हस्तमैथुन, मुखमैथुन सुद्धा करत असतात. अनेकदा असा गैरसमज असतो कि समलिंगी पुरुषांमध्ये सेक्स करताना थेट गुदमैथुनच फक्त करतात. पण तसे नसते. जसे भिन्नलिंगी आकर्षण असणाऱ्या स्त्री-पुरुषांमध्ये प्रत्यक्ष शिश्न-योनी संबंधांच्या आधी आकर्षण, रोमान्स, मिठी, आलिंगन, चुंबन, शक्य झालंच तर हस्तमैथुन व मुखमैथुन सुद्धा केले जाते; अगदी तसेच समलिंगी पुरुषांमध्ये सुद्धा हे सर्व लैंगिक आनंद देणारे प्रकार के...

पर्व 3 - 'सेक्स'वर बोलू काही - भाग 21 (गुदमैथुन - 1)

शिश्न-योनी मैथुन, हस्तमैथुन व मुखमैथुन यांच्याबरोबरच लैंगिक संबंधांचा अजून एक पर्याय म्हणजे गुदमैथुन. यामध्ये पुरुषाचे शिश्न स्त्रीच्या किंवा दुसऱ्या पुरुषाच्या गुदद्वारामध्ये घालून मागे पुढे केले जाते. गुदमैथुन हे मोठ्या प्रमाणात समलिंगी पुरुषां (गे) मध्ये केले जाते. पण त्याचवेळी भिन्नलिंगी स्त्री-पुरुष संबंधांमध्ये सुद्धा अनेकजण गुदमैथुन करत असतात. गुदमैथुनाविषयी खूपच जास्त नकारात्मकता आपल्या समाजात आहे. 'अनैसर्गिक लैंगिक संबंध' असे समजून कित्येक वर्षे कायद्याने गुदमैथुनावर बंदी सुद्धा होती. नुकतीच भारतात कायद्याने यावरची बंदी हटवली आहे. पण तरी मुळात जिथं स्वतःच्याच 'शी' च्या अवयवाविषयी आपल्या मनात मोठ्या प्रमाणात किळस असते, तिथे दुसऱ्याच्या 'शी'च्या अवयवाविषयीचे आकर्षण अनेकांच्या मनातही येऊ शकत नाही. शिवाय गुदमैथुन हे तुलनेने त्रासदायक असल्याने साहजिकच त्याविषयीची भिती सुद्धा अनेकांच्या मनात असते. असं असलं तरी अनेक स्त्री-पुरूष असे सुद्धा आहेत, ज्यांना गुदमैथुन करायला आवडते व त्यांना गुदद्वार हे फक्त 'शी' चा अवयव वाटत नसून त्याविषयी लैंगिक आकर्षण सुद्...