विवाहबाह्य संबंध (ExtraMarital Affairs)
आपल्या आजूबाजूला विवाहबाह्य संबंधांचे प्रमाण खूप वाढत आहे असे आपण सातत्याने ऐकत असतो. मुळात या शब्दाला एव्हाना इतकं बदनाम करून टाकलंय की हा शब्द ऐकता किंवा वाचता क्षणीच, ऐकणाऱ्याच्या किंवा वाचणाऱ्याच्या मनात एक नकारात्मक भावना (negativity) येते.
आता खरं तर विवाहबाह्य संबंध चांगले की वाईट? त्याच्याकडे कसं बघावं? आणि त्याच्याशी डील कसं करावं? या गोष्टींवर बोलणं अतिशय महत्त्वाचं आहेच. शिवाय प्रत्येक विवाहबाह्य संबंध सेक्स पर्यंत पोहचलेले असतातच का? तसे नसेल तर त्यांच्याकडे आपण कसं बघायचं आणि त्याचं नियोजन कसं करायचं? याही महत्त्वाच्या गोष्टी आहेतच. या सगळ्यांवर आपण पुन्हा कधीतरी बोलूच.
पण सध्या तरी विवाहबाह्य संबंधांमध्ये आपल्या वैवाहिक जोडीदाराशिवाय इतर कुणाशी असलेले लैंगिक संबंध या मुद्द्यावर आपण फोकस करू.
त्यासाठी आधी *कोणत्याही व्यक्तीला आपल्या वैवाहिक जोडीदारा व्यतिरिक्त इतर कुणासोबत लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा का होवू शकते? किंवा ते का आवडू शकते?* यावर आपण जरा विचार करूयात. मला वाटतात ती यामागची कारणे पुढीलप्रमाणे :
1. एका जोडीदाराला सेक्स खूप आवडतो व हवाहवासा वाटतो; पण दुसऱ्या जोडीदाराला तितकासा नको असतो.
2. जोडीदारासोबत सेक्स करण्याची इच्छाच होत नाही, पण त्याचवेळी दुसऱ्या सोबत सेक्स करण्याची मात्र खूप इच्छा होते. (याचीही अनेक वेगवेगळी कारणे असू शकतात.)
3. लग्न झालेल्या जोडीदारासोबत सेक्स करताना मजाच येत नाही, मात्र त्याचवेळी दुसऱ्या सोबत सेक्स करताना मात्र खूप मजा येते. एक वेगळाच आनंद मिळतो.
4. जोडीदारासोबत सेक्स मधल्या वेगवेगळ्या पोझिशन करता येत नाहीत, पण त्याचवेळी दुसऱ्या सोबत मात्र खूप वेगवेगळ्या सेक्स पोझिशन एन्जॉय करता येतात.
5. जोडीदाराला माझ्याशी सेक्स करण्यात फार इंटरेस्ट नसतो, पण त्याचवेळी त्याला/तिला मात्र माझ्याशी सेक्स करायला खूप आवडते.
6. जोडीदारासोबत सेक्स करताना खूप त्रास होतो; पण त्याच्या/तिच्या सोबत करताना मात्र त्रास तर होत नाहीच, पण खूप आनंद मिळतो.
7. सेक्स करताना जो आदर, प्रेम व सामावून घेणं अपेक्षित असतं, ते जोडीदाराकडून मिळत नाही. त्याच्या/तिच्या कडून मात्र ते मिळतं.
8. जोडीदाराला माझ्यासाठी वेळच नसतो. तो/ती मात्र माझ्यासाठी आवर्जून वेळ काढतो/काढते.
9. जोडीदार तर आवडतो/आवडतेच; पण त्याचवेळी तो/ती सुद्धा आवडते आणि त्याच्या/तिच्यासोबत सेक्स करण्याची इच्छा ही जोडीदाराइतकीच किंवा त्याहूनही जास्त असते.
10. माझ्या सौंदर्या बद्दल जोडीदाराला अजिबात आकर्षणच राहिलेले नाही. पण तो मात्र माझ्या सौंदर्याच्या प्रेमात आहे./ जोडीदाराला माझ्यात काहीच खास वाटत नाही. पण तिला मात्र मी खूप आवडतो.
याव्यतिरिक्त अजूनही काही कारणे असू शकतात. तुम्हाला माहिती असलेली याव्यतिरिक्त इतर कारणे असतील, तर ती पण नक्की सांगा.
आणि सोबतच यातील कोणती कारणं तुम्हाला अशी वाटतात की ज्यांच्यासाठी विवाहबाह्य लैंगिक संबंध हा पर्याय निवडणे चूक आहे किंवा बरोबर आहे असे तुम्हाला वाटते?
आपले मत, अनुभव, प्रतिक्रिया फेसबुक किंवा व्हॉट्सॲप वर नक्की कळवा.
- सचिन (8424041159)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा