पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही - भाग 7 (सेक्स & रिलेशन्स)
ते दोघे फ्रेंड्स होते. कामानिमित्त एकत्र आले. एके दिवशी काही वेळ एकत्र घालवल्यानंतर एका क्षणी दोघेही मूड मध्ये असताना एकमेकांच्या जवळ आले आणि संगनमताने सेक्स एन्जॉय केला. दुसऱ्या दिवशी दोघांच्याही मनात हा गिल्ट राहिला की आपण समोरच्यावर जबरदस्ती तर नाही केली? म्हणजे जरी संगनमताने सेक्स केला असला आणि त्यात आपल्याला आनंद मिळाला असला, तरी तिला/त्याला ते नक्की ते मनापासून करायचे असेल का? की आपण सुरूवात केली आणि त्याला/तिला नाही म्हणता न आल्याने पुढे सगळं झालं असेल?
दोघांच्याही मनात असणारा हा गील्ट दुसऱ्या दिवशी दोघांनी एकमेकांशी बोलून दाखवला. त्यावेळी दोघांनाही हे सारखेच आवडले असल्याचे कळले. त्यामुळे दोघेही खुश झाले. पण त्याचवेळी या रिलेशन चा अर्थ कमिटमेंट किंवा प्रेम किंवा इमोशनल रिलेशन म्हणून तर घेणार नाही ना? अशी भीती त्याच्या मनात होतीच. ती त्याने तिला बोलून दाखवली. पण तिने लगेच स्पष्टपणे सांगितलं की तिच्या मनात असं काहीही नाही आणि हा फक्त सेक्स आहे, जो दोघांनाही आवडलं म्हणून आपण केलाय. यात कुणीच कुणाला गुंतवून ठेवायचा किंवा गुंतायचा प्रश्न नाही. तिचं हे मत ऐकून त्याला सुद्धा खूप समाधान वाटलं. त्यानंतर दोघांनीही अनेकदा कामानिमित्त एकत्र आल्यावर सेक्स एन्जॉय केला. पण दोघांनाही हे स्पष्ट माहिती आणि मान्य होतं की हा सेक्स म्हणजे रिलेशनशिप नाही. आपण दोघेही चांगले मित्र मैत्रिणी आहोत. एकमेकांना आवडतो. एकमेकांविषयी आकर्षण वाटते, ओढ वाटते आणि म्हणून जेव्हा जेव्हा सोबत असतो, तेव्हा सेक्सचा आनंद घेतो. बस्स. यापेक्षा पुढे काहीही नाही. ही क्लिआरिटी असल्यामुळे दोघांनीही या नात्यात भावनिक गुंते येणार नाहीत याची काळजी घेतली होती. याचा अर्थ त्यांच्या मनात एकदाही एकमेकांविषयी अधिक ओढ किंवा इमोशनल होण्याचे प्रसंग आलेच नाहीत असं नाही; पण जेव्हा जेव्हा असे प्रसंग आले तेव्हा त्यांनी आधी स्वतः स्वतःला समजावलं आणि गरज पडेल तेव्हा एकमेकांशी स्पष्ट बोलून दोघांनी मिळून एकमेकांना समजावलं आणि त्याचा दोघांनाही चांगलाच फायदा होत गेला. ज्यामुळे सेक्स आणि इमोशनल रिलेशन किंवा ज्याला आपण कमिटेड रिलेशनशिप म्हणू, या दोन गोष्टी वेगवेगळ्या ठेवता आल्या.
(क्रमशः...)
- सचिन थिटे (8424041159)
(आपले मत, प्रतिक्रिया, अनुभव, सूचना नक्की कळवत राहा.)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा