पर्व 4 - सेक्स वर बोलू काही - भाग 6 (वीर्याचा वास येतोय? Do you smell semen?)

अनेकदा पुरुषांच्या वीर्यमुक्ती नंतर वीर्याला अतिशय तीव्र दुर्गंध येतो. जर असा वास तुमच्या किंवा तुमच्या जोडीदाराच्या वीर्याचा येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. आजच्या लेखात आपण याच विषयी थोडे अधिक जाणून घेऊयात.

पुरुषांचे वीर्य हे अनेक प्रकारच्या घटकांचे मिश्रण असते. यात सर्वाधिक वाटा हा पाण्याचा असतो. म्हणूनच अनेक वेळा वीर्याला अजिबात वास जाणवत नाही. पाण्याबरोबरच फ्रुक्टोज हा घटक सुद्धा वीर्यामध्ये मुबलक प्रमाणात असतो, जो वीर्यामधील शुक्राणूंना ऊर्जा देण्यात तसेच वीर्याची गती व चिकटपणा वाढवण्यात मदत करतो. फ्रुक्टोज मुळे सामान्यतः पुरुषांच्या वीर्याला एक विशिष्ट प्रकारचा हलकासा वास येतो. हा वास काही प्रमाणात एखाद्या गोड पदार्था सारखा किंवा साखरेसारखा असतो. या वासाला इंग्रजीमध्ये Sugary smell (शुगरी स्मेल) असेही म्हणतात. वीर्यामधील pH चे प्रमाण आणि वीर्यामध्ये असणारे सायट्रिक ऍसिड, कॅल्शियम, मॅग्नेशियम यांसारखे घटक सुद्धा वीर्याला येणाऱ्या वासामध्ये कारणीभूत असतात. या सर्व घटकांचे प्रमाण कमी जास्त झाले की त्यानुसार वीर्याच्या वासात सुद्धा बदल होवू शकतो. म्हणूनच वीर्याच्या वासाचे प्रमाण प्रत्येक पुरुषागणिक कमी अधिक, वेगवेगळे असू शकते. कधी कधी हा वास अजिबात जाणवत सुद्धा नाही, कधी कधी हलकासा जाणवतो, तर कधी कधी अगदी स्पष्ट जाणवतो. कधी कधी हा वास अमोनिया, क्लोरीन किंवा ब्लिच सारखा थोडा तीव्र सुद्धा जाणवू शकतो. हे अगदी नॉर्मल असते आणि काळजी करायची अजिबात गरज नसते. पण मग काळजी करण्याची वेळ कधी येते? ते पाहुयात.

कधी कधी वीर्य मुक्तीनंतर वीर्याचा वास खूपच जास्त तीव्रतेने जाणवायला लागतो. हा वास अतिशय उग्र, एखाद्या सडलेल्या पदार्थासारखा किंवा माशाच्या वासासारखा येतो. यालाच इंग्रजीमध्ये foul or rotten smell किंवा fishy smell (फिशी स्मेल) असेही म्हणतात. जर हा वास जास्त प्रमाणात जाणवत असेल, तर ही नक्कीच इन्फेक्शन किंवा STD (Sexually Transmitted Disease) म्हणजेच लैंगिक संक्रमित रोगाची लक्षणे असू शकतात. (यासोबतच जर लघवीच्या वेळी जळजळ होणे, वृषणांमध्ये वेदना होणे असे काही होत असेल तर तातडीने डॉक्टरांना दाखवायला हवे.) त्याचबरोबर कधी कधी वीर्याचा वास हा खूपच जास्त प्रमाणात गोड किंवा अगदीच साखरेसारखा जाणवतो, ज्याला स्वीट स्मेल असे म्हणतात. असे असल्यास त्या व्यक्तीला डायबेटिज असण्याची जास्त शक्यता असते. त्यानुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्त, लघवी तपासून घ्यायला हवी.
कधी कधी वीर्यामध्ये शरीराचा घाम किंवा लघवीचे थेंब किंवा त्यांचे वास एकत्र आले तरी वीर्याचा काही प्रमाणात दुर्गंध येवू शकतो. अनेकदा शिश्र्नमुंडावरील त्वचा मागे ओढून शिश्र्नमुंड व त्याच्या तळाशी असणारी जागा नियमित स्वच्छ न केल्याने तिथे वीर्याचे थेंब साचून राहून त्याचा सुद्धा दुर्गंध येवू शकतो. तसेच शिश्र्नाभोवतीचे केस नियमितपणे स्वच्छ न ठेवल्यास तिथे सुद्धा घाम किंवा वीर्याचे थेंब साचून राहून त्याचा सुद्धा दुर्गंध येवू शकतो. अशा प्रकारच्या अस्वच्छतेमुळे सुद्धा अनेकदा Sexually Transmitted Disease म्हणजेच लैंगिक संक्रमित रोग होण्याची शक्यता असते. म्हणूनच लैंगिक अवयवांची स्वच्छता हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे.

जर तुमच्या स्वतःच्या किंवा तुमच्या सेक्स पार्टनर च्या वीर्याला असा उग्र, कुजल्यासारखा, सडल्यासारखा, माशासारखा किंवा अतिशय गोड वास येत असेल तर नक्कीच डॉक्टरांना (sexologist) भेटून निदान करून घ्यायला हवे. शिवाय अशा वेळी लैंगिक संबंध करताना कंडोमचा वापर कम्पल्सरी करावा, जेणेकरून आपल्या सेक्स पार्टनर ला सुद्धा यातून काही आजार होणार नाहीत. एकापेक्षा जास्त जोडीदारासोबत सेक्स रिलेशन ठेवताना किंवा कोणत्याही पुरुषाशी प्रथम संबंध ठेवताना तर स्त्रियांनी ही काळजी नेहमीच घ्यायला हवी. कंडोमचा वापर हा अशा प्रकारच्या अनेक लैंगिक आजारांपासून आपल्याला वाचवू शकतो. त्यामुळे नव्याने कुणाशीही, अगदी जवळच्या मित्र मैत्रिणीशी सुद्धा संबंध ठेवताना किमान सुरुवातीचे काही दिवस तरी पूर्ण खात्री पटेपर्यंत कंडोमचा वापर कम्पल्सरी करायलाच हवा.
-
सचिन (8424041159)
(आपले मत, प्रतिक्रिया, अनुभव, सूचना नक्की कळवा.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध