पर्व 3 - 'सेक्स'वर बोलू काही- भाग 12- हस्तमैथुन म्हणजे पाप, घाणेरडी गोष्ट? हस्तमैथुन करणे योग्य कि अयोग्य?

हस्तमैथुन ही आज किंवा काल नव्याने उदयाला आलेली काहीतरी वेगळी भानगड नसून ही अगदी अनादि काळापासून मानवी समाजात अस्तित्वात असणारी क्रिया आहे. आपल्याकडे अनेक अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांनी व बाबा-बुवांनी हस्तमैथुन हे 'पाप' असल्याचे सांगितले आहे. प्रत्यक्ष हस्तमैथुनच नाही, तर हस्तमैथुनासंदर्भात मनात येणारे विचार सुद्धा पाप असल्याचे व अशा व्यक्तींचे हे वर्तन अनितीमान वगैरे असल्याचे त्यांनी सांगून ठेवलेले आहे. त्यामुळे एकूणच याविषयीचे आधीच अज्ञान आणि त्यात या महाशयांनी घालून ठेवलेली ही भीती यामुळे हस्तमैथुन हा नेहमीच बदनाम झालेला व केलेला विषय राहिला आहे. याविषयी योग्य ज्ञान देणारे आपल्या जवळपास कोणी भेटत नाही आणि त्यामुळे हा विषय मग तसाच मनात दबून राहतो.
इथं मुळात एक लक्षात घ्यायला हवं कि हस्तमैथुन ही एक अतिशय नैसर्गिक गोष्ट आहे. मनुष्याप्रमाणेच काही प्राणी सुद्धा हस्तमैथुन करत असतात. वयात आल्यानंतर मुला-मुलींच्या शरिरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे भिन्नलिंगी किंवा समलिंगी व्यक्तींविषयी लैंगिक आकर्षण वाटायला लागते. मेंदूतून सतत लैंगिक अवयवांकडे कामसंदेश पाठवले जातात. यातून सेक्सची भावना मनात तीव्र होत जाते. पण ही भावना पूर्ण करण्याचा मार्ग उपलब्ध नसतो, तेव्हा हस्तमैथुन करावेसे वाटणे हे अगदी साहजिक असते. या वयात मेंदूत जी रसायने स्रवत असतात, त्यामुळे आपल्या मनात सतत लैंगिक आकर्षणाच्या भावना तयार होत असतात. या भावनांचे उत्सर्जन करण्याचे काम हस्तमैथुन मधून होत असते. त्यामुळे हस्तमैथुन ही अजिबात घाणेरडी वगैरे गोष्ट नसून सेक्सविषयी भावनांचे अतिशय नैसर्गिक आउटलेट म्हणून हस्तमैथुनाकडे पाहायला हवे.
 
हस्तमैथुन ही अतिशय खाजगी बाब असल्यामुळे त्याचा इतर कुणालाही काहीच त्रास होत नाही. 'हस्तमैथुनाची सवय लागते आणि मग ती कधीच सुटत नाही आणि त्यामुळे आयुष्यात प्रचंड नुकसान होते' हे अजिबात खरे नाही. खरंतर हस्तमैथुनाचे कोणतेच दुष्परिणाम नसल्यामुळे त्याचे आयुष्यावर, शरीरावर किंवा मनावर वाईट परिणाम होण्याचा प्रश्नच येत नाही. जसे आपल्याला भूक लागते, झोप येते हे साहजिक आहे, तसेच हस्तमैथुनाची इच्छा ही सुद्धा तितकीच साधी व नैसर्गिक बाब आहे. भूक लागण्याच्या किंवा झोप येण्याच्या सवयीकडे आपण ज्या दृष्टीने बघतो, त्याच दृष्टीने हस्तमैथुनाकडे बघायला लागलो तर हे सगळे गैरसमजांचे व भितीचे ताण निघून जाऊन हस्तमैथुनामधली खरी मजा आपल्याला अनुभवता येऊ शकते.

So, just relax. Don't overthink about it. Just do it, feel it and enjoy it.🤗
(त्यामुळे निश्चिंत राहा. अति विचार करू नका. या सुंदर क्षणांची छान अनुभुती घ्या, मजा करा आणि मस्त आनंद घ्या.)

- सचिन (8424041159)
ईमेल - srthite@yahoo.co.in

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध