विवाहबाह्य संबंध (ExtraMarital Affairs) - भाग ३

आपल्या पहिल्या पोस्टमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे - विवाहबाह्य संबंध चांगले की वाईट? त्यांच्याकडे कसं बघावं? त्याच्याशी डील कसं करावं? प्रत्येक विवाहबाह्य संबंध सेक्स पर्यंत पोहचलेले असतातच का? तसे नसेल तर त्यांच्याकडे कसं बघावं आणि त्यांचं नियोजन कसं करावं? - या विवाहबाह्य संबंधांच्या बाबतीत अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्यांच्यावर बोलायलाच हवं आणि पुढे आपण ते बोलू सुद्धा. पण सध्या तरी आपण विवाहबाह्य संबंधांमध्ये आपल्या वैवाहिक जोडीदाराशिवाय इतर कुणाशी असलेले लैंगिक संबंध या मुद्द्यावर फोकस करत आहोत.

यासाठी या लेखात आपण आधी लैंगिक संबंध या विषयावर बोलुयात. आता लैंगिक संबंध याची साधी सरळ व्याख्या करायची झाली तर - कोणत्याही दोन किंवा अधिक प्रौढ व्यक्तींनी परस्पर संमतीने एकमेकांशी ठेवलेले लैंगिक संबंध - इतकी साधी व्याख्या होवू शकते. पण फक्त 'लग्न' या एका व्यवस्थेमुळे त्यात अनेक गुंते आणि अनेक प्रकार आपल्याला दिसतात. लग्न व्यवस्थेमुळे एका कोणत्याही व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यात लैंगिक संबंधांचे साधारण किती आणि काय काय प्रकार असू शकतात ते पाहूया.-
१. लग्नापूर्वी एखाद्या अविवाहित स्त्री/पुरुषासोबत केलेले लैंगिक संबंध
2. लग्नापूर्वी एखाद्या विवाहित स्त्री/पुरुषासोबत केलेले लैंगिक संबंध
3. लग्नापूर्वी एखाद्या विवाहित पण घटस्फोटित किंवा विधवा/विधुर/विभक्त स्त्री/पुरूषासोबत केलेले लैंगिक संबंध
4. लग्नानंतर आपल्याच वैवाहिक जोडीदारासोबत केलेले लैंगिक संबंध
5. लग्नानंतर आपल्या वैवाहिक जोडीदाराशिवाय इतर विवाहित स्त्री/पुरुषासोबत केलेले लैंगिक संबंध
6. लग्नानंतर इतर अविवाहित स्त्री/पुरुषासोबत केलेले लैंगिक संबंध
7. लग्नानंतर इतर विवाहित पण घटस्फोटित/विधवा/विधुर/विभक्त स्त्री/पुरुषासोबत केलेले लैंगिक संबंध
8. ज्याच्याशी आपण भविष्यात लग्न करणार आहोत त्या आपल्याच भावी जोडीदारासोबत लग्नापूर्वी केलेले लैंगिक संबंध

साध्या दोन प्रौढ व्यक्तींमधल्या लैंगिक संबंधांना लग्नाने एवढ्या प्रकारात विभागलेले दिसते. आणि मग या सर्व प्रकारच्या संबंधांना पुन्हा नैतिक अनैतिक या नवीन दोन काल्पनिक व्याख्यांमध्ये विभागण्याचे काम सुद्धा लग्न व्यवस्थेनुसारच करण्यात आले आहे. कायद्याच्या दृष्टीने पाहिले तर फक्त कायदेशीर आणि बेकायदेशीर हे दोनच प्रकार पडतात. त्यातही कोणत्याही दोन किंवा अधिक प्रौढ व्यक्तींनी परस्पर संमतीने एकमेकांशी केलेल्या लैंगिक संबंधांना कायद्याने मान्यताच दिलेली आहे. पण आपल्या नैतिक अनैतिकतेच्या काल्पनिक संकल्पना मात्र हे मान्य करण्यास अजूनही तयार नाहीत. ही मोठी अडचण आहे. आणि त्यामुळे पुढे येणाऱ्या लैंगिक, सामाजिक समस्यांचे मूळ इथे आहे असे मला वाटते.

समजा काही वेळासाठी आपण लग्न, कायदा आणि नैतिकता वगैरे सर्व गोष्टी बाजूला ठेवून पाहिले तर वर दिलेल्या संबंधांपैकी कोणते लैंगिक संबंध आपल्याला चुकीचे किंवा बरोबर वाटतात? आणि का?
यावर आपण जरा विचार करूयात.
तुम्हाला काय वाटते? तुमचे स्वतःचे मत नक्की सांगा.

आपले मत, अनुभव, प्रतिक्रिया, शंका, सूचना फेसबुकवर किंवा व्हॉट्सॲप वर मेसेज करून नक्की कळवा.
- सचिन (8424041159)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध