शेअरिंग-केअरिंग - 4 - ती, तो आणि लैंगिक संबंध - भाग -3
सुरेशला लग्नाच्या आधीपासूनच सेक्स विषयी नेहमीच विशेष आकर्षण राहिले होते. पण समाजातील सभ्यतेचे निकष लक्षात घेता लग्नानंतर जोडीदारासोबतच सेक्स करायचा असं ठरवून तो स्वतःवर नियंत्रण ठेवून होता. आपल्याला सेक्स विषयी असणारे आकर्षण, आवड व आदर त्याने गीताला लग्नाआधीच सांगितले होते व तिलाही ते मान्य होते. त्यामुळे लग्नानंतर खूप छान, मनसोक्त सेक्स लाईफ दोघेही अनुभवत होते आणि खुश होते. पण एक वर्षभरातच गीताची सेक्ससंदर्भातील ओढ कमी झाली. त्यात तिला सुरेश संदर्भात काहीच तक्रार नव्हती, उलट त्याचा सेक्स बद्दलचा व तिच्या बद्दलचा आदर तिला खूप भावून टाकायचा. पण तिला मनातूनच सेक्सची भावना कमी झाल्यासारखे वाटायला लागले. यावर सुरेशने व तिने अनेकदा संवाद साधला. गीताला सेक्सोलॉजिस्ट कडे जावं का असंही वाटत होतं. पण त्यात ती स्वतःकडे खूपच न्यूनगंडातून बघतेय हे जाणवल्याने तो पर्याय मागे पडला. संवादातून व काही काळ वाट पाहून मार्ग निघतोय का पाहूया असं ठरलं. आता लग्नाला जवळपास पाच-सहा वर्षे झाली; पण अजूनही सुरेशला हवी तशी व गीतामध्ये पूर्वी होती तशी सेक्स पार्टनर मिळत नाहीये.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा