शेअरिंग-केअरिंग - 3 - ती, तो आणि लैंगिक संबंध - भाग -2

 लग्नानंतर काही महिन्यांतच त्या दोघांमध्ये वाद व्हायला सुरुवात झाली होती. त्याचे एक महत्त्वाचे कारण त्यांच्यातील लैंगिक संबंध सुद्धा होते. मीनासाठी सेक्स जास्त हवाहवासा वाटणारा होता. त्या तुलनेत अतुल ला सेक्स ची फार जास्त ओढ नव्हती. त्याला सेक्स अगदीच नकोय असंही नव्हतं; पण त्याचवेळी मीनाच्या व त्याच्या अपेक्षेमध्ये खूपच तफावत होती. हेच त्यांच्या वादाचे मूळ कारण ठरत होते. तिची सेक्स बद्दल असणारी अपेक्षा तो पूर्ण करू शकत नाही हे थोड्याच दिवसांत दोघांच्याही लक्षात आले होते. यावर त्याने तिच्या चारित्र्यावर व स्त्रीत्वावरच शंका घ्यायला सुरुवात केली होती, तर तिने त्याच्या पुरुषत्वावर शंका घ्यायला सुरुवात केली होती. अतुलच्या मते - 'स्त्रियांनी अशी सेक्स बद्दलची अतिरिक्त अपेक्षा ठेवणे किती चुकीचे आहे. मी काय सेक्स करण्यात अक्षम आहे असं नाही, पण हिचे थोडक्यात समाधानच होत नाही.' तर मीना चे म्हणणे होते कि - 'हा खूप कमी ऍक्टिव्ह असतो. नाममात्र सेक्स करायचा म्हणून करतो. त्यात अजिबात समाधान नसते. मी समाधानी झालेय कि नाही याचा विचार देखील तो करत नाही.' अतुलला मात्र हे मान्यच नव्हते व उलट तिच्याच अपेक्षा अतिरिक्त व एखाद्या स्त्रीला न शोभणाऱ्या आहेत असं वाटत असल्याने यावर उपाय शोधण्याचाही विचार त्यांच्या मनात येत नव्हता. शेवटी सहा महिन्यांतच प्रकरण घटस्फोटापर्यंत पोचले होते आणि अर्थातच घटस्फोटासाठी पुढे आलेली कारणे मात्र वेगळी होती.

यामध्ये मीना खरंच चुकीची होती का? तिची सेक्स बद्दल असणारी अपेक्षा योग्य होती का? एका स्त्रीने अशा अपेक्षा बाळगणे बरोबर आहे का? स्त्रीने जे मिळेल त्यात समाधानी राहायला नको का? सेक्स हा मुद्दा एवढा महत्वाचा असू शकतो का? अतुलचे यात काही चुकले का? त्याच्या मते त्याची असणारी लैंगिक क्षमता ही मीना च्या मते कमी पडणारी होती, यात त्याचा काही दोष आहे का? दोघांनीही एकमेकांच्या स्त्रीत्वावर व पुरुषत्वावर शंका घेणे योग्य होते का?
यावर घटस्फोट घेऊन एकमेकांपासून वेगळे होणे हाच योग्य मार्ग होता का?
काय वाटतं तुम्हाला? नक्की सांगा.
- सचिन (8424041159)
(आपल्या प्रतिक्रिया, मते, अनुभव नक्की शेअर करा.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध