शेअरिंग-केअरिंग - 6 - ती, तो आणि लैंगिक संबंध - भाग - 5

 कालच 'अस्तित्व' नावाचा मराठी सिनेमा पाहिला. तो पाहिल्यानंतर ज्या गोष्टींवर पुढच्या काही लेखानंतर मग लिहायचं असं आधी ठरवलं होतं, त्या मुद्द्यांवर न राहवून आत्ताच थोडं लिहीत आहे.

पुरुषांनी स्वतःची लैंगिक गरज पूर्ण करण्यासाठी (जाणीवपूर्वक 'लैंगिक भूक' हा शब्द वापरत नाहीये, कारण तो अशा प्रत्येक ठिकाणी लागू होतोच असं नाहीये) बाहेर कधीही, कितीही संबंध ठेवले तरी त्याच्याकडे फारशा नकारात्मकतेने न पाहणारा समाज आणि पुरुष मात्र असेच जर संबंध एखाद्या विवाहित स्त्रीने बाहेर ठेवले, तर आकाशपाताळ एक करतात आणि तिची अगदी जगण्याची सुद्धा लायकी नसल्यासारखे तिच्याशी वागतात. हा दुटप्पीपणा आजही समाजात सर्वच पातळ्यांवर आहे. यात अपवादात्मकच कोणी वेगळं असू शकेल.
मुळात 'लैंगिक संबंध' या गोष्टीकडेच इतक्या वाईट दृष्टीने पाहिलं जातं कि त्याविषयी साधं उघड बोलायचं सुद्धा कोणी धाडस करत नाही. लैंगिक संबंध ही एक आनंदाची व समाधान मिळवून देणारी, मनातील नाजूक भावनेतून सुरू होऊन एकमेकांना तृप्त करणारी ही विलक्षण क्रिया समजून घेणे तर दूरच; पण किमान एक 'नैसर्गिक गरज' म्हणून तरी तिच्याकडे बघण्याची निखळ दृष्टी एक समाज म्हणून व माणूस म्हणून आपण स्वतःमध्ये विकसित करणार आहोत कि नाही? आणि मग त्याच्या पुढच्या टप्प्यावर ही लैंगिक गरज फक्त पुरुषांची नसते; तर स्त्रियांची सुद्धा तेवढीच असते हे कधी समजून घेणार आहोत? पारंपारिक बुरसटलेल्या ठोकळेबंद विचारांतून स्वतःला बाहेर काढून वास्तव म्हणून या लैंगिक संबंधांकडे पाहायला शिकायला हवं. आपण स्वतः आधी लैंगिक संबंधांना व लैंगिक इच्छांना नैसर्गिक क्रिया व भावना म्हणून मान्य करायला शिकू, तेव्हाच समाज म्हणून लैंगिक संबंधांविषयी एक निकोप व वास्तवदर्शी समाजमन तयार करण्यात हातभार लावू शकू.
अर्थात एकदा आधी हा विचार स्वीकारल्यानंतर याला धरून पुढच्या टप्प्यावर यासंबंधी व्यवस्थापनाचे अनेक मुद्दे सोबत येतात, जे समजून घेऊनच मग या दिशेने मार्गक्रमण करायला हवे.
- सचिन (8424041159)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध