शेअरिंग-केअरिंग - 11 - ती, तो आणि लैंगिक संबंध - भाग - 8

 गेल्या आठवड्यात ब्रिटन मधील गार्डीयन वृत्तपत्रामध्ये एका विवाहित पुरुषाने दिलेली जाहिरात सगळीकडे खूप व्हायरल झाली. ती जाहिरात अशी होती-

'आमच्या लग्नाला चाळीस वर्षं झाली. लैंगिकदृष्ट्या आम्ही दोघेही सक्रीय आहोत. आम्हा दोघांना एकमेकांचं कौतुक आहे. पण माझ्या पत्नीला कधीतरी एखाद्या लैंगिक जोडीदाराची निकड भासते आणि तिला असा 'friend with benefits' हवा आहे. आम्ही याबद्दल एकमेकांशी बोललो आहोत. आमची मुलंबाळं आमच्यापासून लांब राहतात. त्यामुळे त्यांना याविषयी काही माहिती होण्याची शक्यता नाही. आणि ऑनलाइन पद्धतीने आम्ही हे करू इच्छित नाही. तेव्हा हे कसं करावं ?' (या बातमीची लिंक खाली कमेंट बॉक्स मध्ये देत आहे.)
जगभर अनेकजण या पुरुषाचे व त्यांच्या नात्यात असणारी ही मोकळीकता व समंजसपणा याचे कौतुक करत आहेत. अर्थात काहीजण हे वाचून नाके मुरडण्याचे व बोटे मोडण्याचे कामही करत असतील नक्कीच. पण खरंच जर नात्यात इतका समंजसपणा असेल आणि लैंगिक इच्छांकडे इतक्या स्वच्छ नजरेने व वास्तव म्हणून पाहणारे आणि एकमेकांच्या लैंगिक इच्छा व गरजांचा आदर करणारे जोडीदार असतील तर जगण्यात खरंच मजा असेल ना!
आता अशी परिस्थिती असणारी उदाहरणे फक्त बाहेरच्या देशांत असतात आणि आपल्या देशात नाहीत असं अजिबात नाही बरं का. पण ते इतक्या मोकळेपणाने स्विकारण्याची आपल्या समाजाला अजूनही सवय नाही हे नक्की. त्यामुळे एकतर असे अनेक स्त्री-पुरुष जोडीदार आपल्या या लैंगिक इच्छा नाईलाजाने तशाच दडपून टाकतात किंवा मग काहीजण यातूनच लपूनछपून बाहेर संबंध ठेवतात. त्यातूनच मग अनेकदा स्त्रियांची यात फसवणूक होऊन त्यांना ब्लॅकमेल करूनअनेक वाईट अनुभवांना पुढे सामोरे जावे लागते. काही पुरुषांना सुद्धा यातून कधीकधी अनेक त्रासांना तोंड द्यावे लागते. शिवाय हे उघड झाल्यावर समाजात होणारी बदनामी आणि वैवाहिक व कौटुंबिक आयुष्याची होणारी हानी तर कधीच भरून न येणारी असते. तिथून पुढचे सगळे आयुष्य हाच एक शिक्का मिरवत खाली मान घालूनच जगावे लागते. तरीही तुलनेने यात पुरुषांना फार त्रास होत नाही, पण स्त्रियांचे मात्र आयुष्यच उध्वस्त होते. खरंतर याच भितीने अनेक स्त्री-पुरुष आपल्या लैंगिक इच्छांचा बळी देत आतल्या आत सतत अस्वस्थ जगत असतात. नैतिकता हे तर आपल्या समाजाने या अवस्थेवर घातलेले कोंदणच आहे. याच कोंदनातून अनेकांना अनेकदा मानसिक अस्वास्थ्याला तोंड द्यावे लागते.
खरंच जर लैंगिक संबंधावरचे हे नैतिक कोंदण काढून टाकले आणि लैंगिक इच्छा व लैंगिक संबंधाचे स्वातंत्र्य समाजमान्य झाले तर आज 'एकपत्नी व एकपती व्रता'चा आणि फक्त लग्नाच्या जोडीदारासोबतच लैंगिक संबंध ठेवण्याचा आग्रह धरणारे किती जण त्यांच्या या आग्रहावर टिकून राहतील बरं? मुळातच एकापेक्षा जास्त व्यक्तींसोबत लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा ही प्रत्येकात उपजत व नैसर्गिक असते हे आधी आपण मान्य करायला हवे. आणि गेले कित्येक वर्षे ही कुटुंबव्यवस्था व आयुष्यभर एकाच व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवण्याचे बंधन कायम असूनसुद्धा अजूनही ही इच्छा कायम आहे. अर्थात काहीजणांना मुळातच लैंगिक इच्छा कमी असू शकते किंवा लैंगिक संबंधांविषयी असलेल्या नकारात्मक भावनेने त्याविषयीची ओढ वाटत नाही असेही असू शकते. असे अपवाद वगळता प्रत्येकाला अनेकदा अनेक व्यक्तींबाबत लैंगिक इच्छा मनात आलेली असते.
निसर्गाने आपल्या सर्वांना नैसर्गिकरित्याच एकापेक्षा जास्त व्यक्तींशी लैंगिक संबंध ठेवण्याच्या उद्देशानेच ही लैंगिक इच्छा निर्माण केली आहे. पण आपण मात्र आपणच तयार केलेल्या या नैतिकतेच्या आभासी कल्पनांच्या कोंदणाने निसर्गाच्या विरुद्ध जाऊन आपल्या या इच्छांचे दमन करत असतो.
- सचिन (8424041159)
(आपली मते, प्रतिक्रिया, अनुभव वरील व्हाट्सअप्प नंबर वर नक्की कळवा.)

टिप्पण्या

  1. अगदी बरोबर आहे पण आपली लहानपणी पासूनच अशी conditioning झालेली असते की एकदा लग्न झालं की दुसऱ्याचा विचार न करावा किव्वा आपली लैगिक गरज फक्त आपल्या जोडीदारकडूनच भागवावी.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध