पर्व 3 - 'सेक्स'वर बोलू काही - भाग 16 (परहस्तमैथुन म्हणजे काय? & हस्तमैथुन करताना घ्यायची काळजी)

हस्तमैथुनाविषयी आपण आत्तापर्यंत बरंच समजून घेतलं आहे. त्याविषयीचे गैरसमज व हस्तमैथुनाचे फायदे सुद्धा आपण पाहिले. यातीलच एक प्रकार म्हणजे परहस्तमैथुन. याविषयी सुद्धा जाणून घेऊ व परहस्तमैथुन किंवा हस्तमैथुन करताना काय काळजी घ्यायला हवी तेही समजून घेऊ. हस्तमैथुन म्हणजे - स्वतःच्या हाताने आपल्या लैंगिक अवयवांना स्पर्श करून उत्तेजित करणे व त्यातून कामपूर्ती मिळवणे- हे आपण याआधी व्यवस्थित समजून घेतले आहे. तसेच परहस्तमैथुन म्हणजे दुसऱ्याच्या हाताने आपल्या लैंगिक अवयवांना स्पर्श करवून घेऊन लैंगिक आनंद मिळवणे किंवा आपल्या हाताने दुसऱ्याच्या लैंगिक अवयवांना स्पर्श करून त्यांना लैंगिक आनंद मिळवून देणे होय. भिन्नलिंगी आकर्षण असणाऱ्या जोडप्यांमध्ये स्त्रीने पुरूषाच्या शिश्नाला हात लावणे, शिश्नदंडावरून हात फिरवणे, हलक्या हाताने शिश्नमुंडावरील त्वचा मागे पुढे करणे व पुरूषाने स्त्रीच्या शिश्निकेला व योनिपटलांना स्पर्श करणे, त्यांना हलक्या हाताने चोळणे, मर्दन करणे हे खूपच रोमांचक अनुभव देणारे असते. समलिंगी पुरूष व समलिंगी स्त्रिया सुद्धा आपल्या आवडत्या जोडीदारासोबत अशा प्रकारे रोमांचक अनुभव घेऊ शकतात.
अनेकदा हस्तमैथुनापेक्षा परहस्तमैथुनामध्ये जास्त आनंद मिळतो. पण कधीकधी परहस्तमैथुन हे अनिच्छेने केलेले असेल तर ते दोघांना किंवा एकाला आनंद देणारे नसून उलट उत्साह कमी करणारे देखील असू शकते. त्याकरता ज्याच्याकडून आपण हस्तमैथुन करवून घेणार आहोत किंवा आपण ज्याचे हस्तमैथुन करणार आहोत, अशा दोघांनाही आधी हस्तमैथुनाविषयी व्यवस्थित माहिती व अनुभव असायला हवा, दोघांची मनापासून त्यासाठी तयारी असायला हवी व दोघांना एकमेकांविषयी तसा विश्वास, जवळीक व ओढ पण वाटायला हवी. परहस्तमैथुन हे फक्त भिन्नलिंगी व्यक्ती म्हणजे स्त्री व पुरुष यांच्यातच होते असे नाही, तर समलिंगी स्त्रिया किंवा पुरुष यांच्यात पण होते व दोघे मनापासून तयार, इच्छुक आणि यातील जाणकार असतील तर ते आनंददायी सुद्धा असते. एकमेकांविषयी शारीरिक आकर्षण, ओढ किंवा प्रेम असणाऱ्या दोन जोडीदारांनी जर एकमेकांसोबत स्वेच्छेने परहस्तमैथुन केले तर ते जास्त सुखद अनुभव देणारे असू शकते. मात्र परहस्तमैथुन जर कुणावर लादले जात असेल तर मात्र ते फारसे आनंददायी वाटत नाहीत.
आपल्या स्त्री किंवा पुरूष जोडीदाराला लैंगिक उत्तेजन देण्यासाठी सुद्धा परहस्तमैथुन खूपच फायद्याचे ठरते. जिथं दोघा जोडीदारांच्या लैंगिक इच्छांमध्ये तफावत आहे, अशा वेळी आपल्या जोडीदाराच्या लैंगिक अवयवांना आपल्या हाताने हळुवारपणे स्पर्श करून उत्तेजित करता येते. पण अर्थात जोडीदाराला सुद्धा हे आवडत असेल तरच. जोडीदाराला अजिबातच इच्छा नसेल आणि अशा प्रकारचा स्पर्शही नकोसा वाटत असेल, तर मात्र जबरदस्तीने हे लादता कामा नये. अशा वेळी मग आपल्याच हाताने हस्तमैथुन करणे जास्त योग्य.
हस्तमैथुन हे फक्त हातानेच केले जाते असे नाही तर त्याचे वेगवेगळे प्रकार असतात हेसुद्धा आपण याआधी पाहिले आहे. हाताच्या वापराशिवाय पुरूष पालथे झोपून आपले शिश्न उशीला किंवा गादीला घासून सुद्धा हस्तमैथुन करतात; तर स्त्रिया शिश्निकेवर व योनीपटलांवर पाण्याचा फवारा मारून, स्तन व स्तनाग्रे यांना स्पर्श करून, मांड्या एकमेकांना घासून सुद्धा हस्तमैथुन करत असतात. यातील कोणतेही प्रकार चुकीचे किंवा अनैसर्गिक नसून हे सर्वच योग्य आहेत. एकूण हस्तमैथुन हेच मुळात आरोग्यदायीच आहे. फक्त ते करत असताना काय काळजी आपल्याला घ्यायला हवी त्याविषयी काही गोष्टी आज पाहुयात. पालथे झोपून हस्तमैथुन करत असताना प्रत्येक वेळी प्रत्येकाला उशी किंवा गादीच मिळेल असे नाही. अनेकदा साधी गोधडी, ब्लॅंकेट किंवा या सगळ्यांशिवाय तसेच जमिनीवर किंवा फरशीवर झोपून सुद्धा अनेकजण हस्तमैथुन करतात. अशा वेळी ताठरता आलेले शिश्न खाली घासत असताना शिश्नाच्या स्नायूंवर दोन्ही बाजूंनी अधिक दाब पडतो व अशा अवस्थेत ते घासले असता नंतर काही काळ दुखण्याची, आग होण्याची शक्यता असते. खरंतर शिश्नामधील स्नायूंवर अतिरेक दाब पडत असेल तर आपल्याला त्यावेळीच तसे जाणवते.  ते जाणवल्यावर त्वरित थांबायला हवे. यासाठीच शक्यतो झोपून हस्तमैथुन करताना शिश्नाच्या खाली गादी, उशी किंवा इतर काहीतरी मऊ कापड घ्यायला हवे. जेणेकरून अशा काही वेदना किंवा त्रास होणार नाही. अनेकदा झोपेत नकळत होणारी वीर्यमुक्ती, ज्याला आत्तापर्यंत स्वप्नदोष म्हणून आपल्यापर्यंत पोचवलं आहे, तो काही दोष नसून उलट तुंबलेल्या वीर्याला दिलेली मुक्तीच असते. यावेळी सुद्धा वीर्यमुक्ती होण्यापूर्वी ताठरता आलेले शिश्न जमीन, गोधडी, गादी, उशी किंवा फरशी यांना घासले गेलेले असते. पण त्यात सुद्धा काहीही नुकसान किंवा इजा होण्याची शक्यता नसते.
परहस्तमैथुनावेळी एकाने दुसऱ्याच्या शिश्नमुंडावरील त्वचा मागे पुढे करत असताना हळुवार व अंदाज घेऊन करायला हवे. शिश्नमुंडावरील त्वचा ही शिश्नबंधाशी जोडलेली असते, त्यामुळे जोरजोरात मागे पुढे केले गेले तर तिथे दुखापत किंवा वेदना होऊ शकतात. शिश्निका किंवा शिष्निकामुंड हेसुद्धा खूप नाजूक असतात. त्यांना खूप जोरजोरात घासल्याने दुखापत व वेदना होऊ शकते. त्यामुळे हलक्या हातानेच चोळायला हवे. स्त्रियांनी हस्तमैथुन किंवा परहस्तमैथुन करताना आपल्या योनीमार्गात कोणत्याही वस्तू घालणे टाळावे. पुरुषांनी हस्तमैथुन केल्यानंतर किंवा झोपेत वीर्यमुक्ती झाल्यानंतर आपल्या शिश्नाभोवतीची जागा नियमितपणे स्वच्छ करत राहायला हवी. रोज अंघोळीच्या वेळी शिश्नमुंडावरील त्वचा मागे सारून त्यामध्ये साचलेला शिश्नमल धुवून शिश्नमुंड सुद्धा नियमितपणे स्वच्छ ठेवायला हवे. तसेच अंघोळीच्या वेळी आपले अंतर्वस्त्र (अंडरवेअर) साबणाने व्यवस्थित स्वच्छ धुवायला हवे. अधूनमधून शक्यतो आठवड्या किंवा महिनाभरातून एकदा तरी गरम पाण्यात भिजायला ठेवून मग धुवायला हवेत. जेणेकरून जांघेमध्ये, शिश्नाभोवती बुरशीजन्य आजार होण्यापासून रोखता येतात. असे आजार झाले असतील, सतत खाज येत असेल तर त्वचारोगतज्ञाना भेटून त्यावर उपचार करून घ्यायला हवेत व पुन्हा होऊ नयेत म्हणून वरील स्वच्छतेचे उपाय करायला हवेत. शिवाय ज्यांना शक्य असेल त्यांनी हस्तमैथुनावेळी एखादा रूमाल वापरणे व त्यावरच वीर्य पडू देणे फायद्याचे ठरते. रुमालाने शिश्न व आजूबाजूची जागा स्वच्छ पण करता येते. 
हस्तमैथुन केल्याने आपल्या मानसिक किंवा शारीरिक आरोग्यावर कोणताही वाईट परिणाम होत नाही हे आपण मागे पाहिलेच. पण जर हस्तमैथुनाची सवय इतकी अतिरेक झाली असेल कि ज्यामुळे आपले इतर कोणत्याच कामात किंवा अभ्यासात लक्ष लागत नाही, सारखा तोच विचार मनात घोळत राहत असेल आणि त्यामुळे दैनंदिन कामांत अडचणी येत असतील तर अशा वेळी मात्र हस्तमैथुन काही काळासाठी तरी कमी किंवा बंद करण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी इतर चांगल्या गोष्टीत आपले मन रमवावे व मित्रमैत्रिणी, नातेवाईक किंवा इतर एखाद्या आवडत्या विषयात जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करून एकांताचा वेळ कमी करावा. शेवटी एक गोष्ट इथे आवर्जून नमूद करावीशी वाटते की हस्तमैथुन करण्याने कोणतेही शारीरिक, मानसिक नुकसान होत नाही; पण हस्तमैथुनाबाबत सतत नकारात्मक विचार, न्यूनगंड किंवा अपराधीपणाची भावना आपल्या मनात असेल तर मात्र त्याचा मानसिक व दैनंदिन जीवनात सुद्धा परिणाम जाणवू शकतो. त्याकरता याविषयी परिपूर्ण माहिती घेऊन मनावर कोणताही नकारात्मक ताण न ठेवता मोकळेपणाने या गोष्टीकडे पाहिले तर यातील निखळ आनंद घेता येऊ शकतो.

- सचिन (8424041159)
srthite@yahoo.co.in

(आपल्या प्रतिक्रिया, आपले किंवा मित्र-मैत्रिणींचे प्रश्न, अनुभव, समस्या वरील नंबर वर व्हाट्सअप्प किंवा ईमेल द्वारे शेअर करू शकता.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध