शेअरिंग-केअरिंग- 28
सध्या खूप विषयांवर लिहावं वाटतंय. बरंच काय काय आहे डोक्यात. शेअरिंग-केअरिंग च्या माध्यमातून सुरू केलेला लैंगिकतेचा मुद्दा पुढे इतका वाढेल असं वाटलंच नव्हतं. पण या लेखांना मिळणाऱ्या प्रतिसादावरून या विषयाची गरज किती आहे ते जाणवत गेले. त्यानुसार त्यासंदर्भाने वाचन वाढत गेले आणि या विषयाची कधी एक स्वतंत्र लेखमाला झाली ते कळलंच नाही. आता अजूनही या विषयावर पुढे बरंच लिहायचं बाकी आहे. त्यामुळे या विषयाची लेखमाला स्वतंत्रपणे चालू ठेवून शेअरिंग-केअरिंग मधून मात्र स्वतंत्रपणे इतर विषयांबद्दल लिहावं असं वाटतंय. पुढे त्यातील एखादा विषय पुन्हा जर असाच वाढला तर तेव्हा त्याची पण वेगळी लेखमाला करता येईल.
तोपर्यंत *शेअरिंग-केअरिंग* व *मुक्त लैंगिकतेच्या दिशेने* या दोन स्वतंत्र लेखमाला चालू ठेवुयात.
आत्तापर्यंत च्या सर्व लेखांना व आधीच्या लेखमालांना सुद्धा मिळणारा आपला सर्वांचा प्रतिसाद खूपच आशादायक आणि उत्साहवर्धक आहे. आपल्या येणाऱ्या प्रतिक्रिया लिहिण्याला अधिक बळ देणाऱ्या आहेत, तशाच त्या जबाबदारीचे भान देणाऱ्याही आहेत. याच जबाबदारीने पुढचेही विषय लिहायचा प्रयत्न करणार आहे. आपली सर्वांची साथ महत्वाची आहेच.
- सचिन (8424041159)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा