मुक्त लैंगिकतेच्या दिशेने (पर्व 2 - समारोप करताना)

लैंगिक संबंधांविषयी सुरू केलेल्या लेखमालेच्या 'मुक्त लैंगिकतेच्या दिशेने' या दुसऱ्या पर्वात आपण लैंगिक इच्छा, त्या व्यक्त करणे, स्त्री-पुरुषांच्या लैंगिक इच्छांमधील वेगळेपण पाहिले; तसेच रघुनाथ धोंडो कर्वे यांनी मुक्त लैंगिक संबंधांविषयी करून ठेवलेली मांडणी सुद्धा पाहिली. पूर्वी लैंगिक संबंध ठेवताना त्यातून येणाऱ्या गर्भारपणामुळे असणारी अनेक बंधनं दूर करणारी आणि सध्याच्या काळात मुक्त लैंगिक संबंधांसाठी वरदान ठरू शकतील अशी गर्भनिरोधके यांविषयी सुद्धा आपण बरीच माहिती घेतली. या सगळ्या प्रवासात 'समाजस्वास्थ्य' पुस्तिका आणि 'संभोग का सुखाचा?' व 'निरामय कामजीवन'  ही पुस्तके सुद्धा सोबत होतीच. आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया व अनुभव शेअरिंग हेसुद्धा सोबत होते. या लेखमाले दरम्यान अनेक नवीन साथी जोडले गेले. अनेकांनी हे लेख इतरांपर्यंत पोचवण्याचा भरपूर प्रयत्न केला. त्याबद्दल आपले सर्वांचे मनःपूर्वक  धन्यवाद.
अनेक मित्र-मैत्रिणींशी मोकळेपणाने सेक्स या विषयावर गप्पा झाल्या. या लेखमालेमुळे किमान त्यांना माझ्याशी तरी मोकळेपणाने बोलता आलं. असा मोकळेपणा सर्वांना अनुभवायला मिळायला हवा. त्यासाठी तसे विश्वासू माणसं आपल्या आजूबाजूला असायला हवेत. यातून अनेक गोष्टी सुटू शकतात. ही लेखमाला या विषयावर काही प्रमाणात का होईना असा मोकळेपणा सर्व वाचकांना मिळवून देऊ शकली तरी सार्थक झाल्यासारखे आहे.
दुसऱ्या पर्वाचा शेवट करताना असं सांगावंसं वाटतं कि- 'लैंगिक संबंध ही बंधनात ठेवायची गोष्ट नसून मुक्तपणे अनुभवायची गोष्ट आहे' हे आता तरी आपण समजून घ्यायला हवं. लैंगिकतेवर घातलेल्या बंधनातून अनेक कौटुंबिक, मानसिक, शारीरिक व सामाजिक समस्या आपण निर्माण करून ठेवल्या आहेत. इतक्या सुंदर नैसर्गिक प्रेरणांचा, भावनांचा असा कोंडमारा करून ठेवल्याने अनेक विवाहित जोडपी व अविवाहित माणसं सुद्धा गुदमरत आयुष्य जगत आहेत. त्याकरताच या लैंगिक भावनांकडे आधी आपण सकारात्मक नजरेने पाहायला शिकायला हवं. तरच पुढच्या पातळीवर त्यांचं व्यवस्थापन करणं आपल्याला जमू शकेल.

यादरम्यान हे सुद्धा जाणवलं कि लैंगिक संबंध या विषयावरच्या लिखाणाला मर्यादाच नाही. कितीही लिहिलं तरी अनेक मुद्दे सुटतच राहतायत आणि पुढेही सुटतच राहतील. पण तरीही या विषयाची गरज खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि म्हणूनच यासंबंधी जमेल तेवढं लिहीत राहण्याचा प्रयत्न असणारच आहे.

या दोन्ही पर्वातील मागचे सर्व लेख वाचण्यासाठी जे फेसबुकवर नाहीत त्यांनी ब्लॉगला सुद्धा नक्की भेट द्या व तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा नक्की नोंदवा. जे फेसबुकवर आहेत त्यांना फेसबुक पेजवर सर्व लेख वाचायला मिळतीलच. त्यासाठी पेजला नक्की जॉईन करा. आपल्या अधिकाधिक मित्र-मैत्रिणी व सहकाऱ्यांपर्यंत हे लेख पोचवत राहुयात. लैंगिक संबंधांविषयीचे मोकळे वातावरण आपल्या आजूबाजूला तयार करायचा आपल्या शक्यतेनुसार प्रयत्न करत राहुयात.
तर मग भेटुयात पुन्हा पुढच्या पर्वात. अजून पुढच्या टप्प्यावरच्या काही गोष्टींवर आणि मागच्या टप्प्यावरच्या राहिलेल्या काही गोष्टींवर बोलण्यासाठी.
- सचिन (8424041159)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध