शेअरिंग-केअरिंग- 2 - ती, तो आणि लैंगिक संबंध - भाग- 1

 एकदा तिने मला असं विचारलं कि 'तुझ्या मते लग्नानंतर इतर स्त्रियांशी लैंगिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषांबद्दल तुझं काय मत आहे?' अर्थातच तेव्हा मी याच मताचा होतो कि 'असं करणं म्हणजे जोडीदाराचा विश्वासघात करण्यासारखेच आहे' असंच माझं मत होतं. त्यावर तिचं म्हणणं होतं कि 'पण त्याच्या बायकोची त्याला परवानगी आहे. तो तिच्यापासून काहीही लपवत पण नाही आणि तिला यात काही चुकीचे पण वाटत नाही. मग काय?' आता हे तर माझ्यासाठी खूपच नवीन होतं आणि हे सरळसरळ बायकोला विश्वासात घेऊन तिच्या भोळेपणाचा फायदा घेऊन तिलाच फसवण्यासारखे आहे असे मला तेव्हा वाटत होते. त्यांच्यात काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी सरळसरळ घटस्पोट घेवून वेगळं व्हावं आणि मग काय ते करावं असं वाटत होतं. पण याव्यतिरिक्त तो त्याच्या बायकोला खूप जीव लावतो आणि तिची खूप काळजी घेतो असं तिचं म्हणणं होतं. शिवाय तिचे सुद्धा तिच्या नवऱ्यावर खूप प्रेम होते आणि तिच्या आजारपणामुळे ती त्याला पुरेसे लैंगिक सुख नाही देऊ शकत, तर त्याने ते इतर स्त्रियांकडून मिळवायला तिला काहीच हरकत नव्हती. उलट या सगळ्यात तो माझ्याशी प्रामाणिक राहून काहीही लपवत नाही हे तिला जास्त महत्वाचं वाटत होतं.

त्यावेळी मला माझ्या मैत्रिणीने सांगितलेल्या त्या जोडप्याचा हा निर्णय रूचला नसला तरी आज मला त्यांच्या त्या निर्णयातील मोठेपणा, समंजसपणा, वैचारिक परिपक्वता जास्त जाणवते व माझ्या तेव्हाच्या विचारांची मर्यादा आणि संकुचितपणा पण जाणवतो. हाच प्रश्न जर मला आज किंवा त्यानंतर काही काळाने माझ्या त्या मैत्रिणीने विचारला असता तर मी तिला नक्कीच खूप वेगळ्या दृष्टीकोनातून त्यांच्या या निर्णयाबद्दल सांगितले असते.
माझं याविषयीचं आत्ताचं मत आणि विचार मी पुढे नक्की मांडेलच.
तोपर्यंत तुम्हाला काय वाटतं त्या दोघांच्या या निर्णयाबद्दल ते नक्की कळवा. तुमच्या आजूबाजूला तुम्हाला असे काही अनुभव आले असतील तर तेही सांगा.
- सचिन (8424041159)
(वरील व्हाट्सअप्प नंबर वर तुम्ही आपल्या प्रतिक्रिया, मतं, अनुभव नक्की लिहून पाठवा.)

टिप्पण्या

  1. लिखाणाची शैली आवडली. सोपी पण प्रभावी..आडपडदा न ठेवता सरळ केलेलं लिखाण

    उत्तर द्याहटवा
  2. खुपच छान सचिन अशा निर्णयाचा मी स्वागतच करीन. मला असं वाटतं की दोन्ही जोडीदार हे व्यक्ती म्हणून स्वतंत्र आहेत. तसेच कोणत्याही एका जोडीदाराचे दुसऱ्या जोडीदारावर ती, किंवा त्याच्या कोणत्याही गोष्टींवर ती, शरीरावर तीसुद्धा हक्क नसला पाहिजे.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद यश. हक्क ऐवजी 'बंधन' नसावे असं म्हणूयात आपण. ते जास्त संयुक्तिक वाटेल.

      हटवा
    2. हा व्याभिचार आहे.
      तुम्हालाच असजरपणाचा त्रास झाला असता तर तिने इतरांबरोबर संबंध ठेवले तर तुम्हाला चालले असते का ? याचाही विचार होणे आवश्यक .

      हटवा
  3. काळाच्या पुढचे विचार आहेत हे. आजच्या संकुचित मनोवृत्तीला ,पुरुष प्रधान व्यवस्थेला सहजा सहजी पचनार नाही.मात्र येणारा काळ स्वीकार करेल.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध